Rahul Gandhi : देशातील चार कोटींहून अधिक लोकांना गरिबीच्या दरीत ढकलण्यात आले असून विकास हा केवळ ‘हमारे दो’साठी असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले, ‘विकास ओव्हरफ्लो, ओन्ली फॉर हमारे दो!’ ते म्हणाले की, देशात केवळ दोघांसाठीच विकास होत आहे, तर आमचे 4,00,00,000 (चार कोटी) बंधू-भगिनी गरिबीत ढकलले गेले आहेत. Rahul Gandhi attack on the Center again, said – pushed 4 crore people into poverty
प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील चार कोटींहून अधिक लोकांना गरिबीच्या दरीत ढकलण्यात आले असून विकास हा केवळ ‘हमारे दो’साठी असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले, ‘विकास ओव्हरफ्लो, ओन्ली फॉर हमारे दो!’ ते म्हणाले की, देशात केवळ दोघांसाठीच विकास होत आहे, तर आमचे 4,00,00,000 (चार कोटी) बंधू-भगिनी गरिबीत ढकलले गेले आहेत.
‘भाजप फेल इंडिया’ हा हॅशटॅग वापरून ते म्हणाले, “या 4,00,00,000 (चार कोटी) पैकी प्रत्येक एक खरी व्यक्ती आहे आणि फक्त एक संख्या नाही. या 4,00,00,000 मध्ये प्रत्येकजण अधिक चांगल्यासाठी पात्र आहे. या 4,00,00,000 पैकी प्रत्येकजण भारत आहे.”
राहुली गांधी यांनी ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाचा हवाला देत एक ग्राफिक इमेजही पोस्ट केली, ज्यामध्ये आरोप केला आहे की 2021 मध्ये दोन टॉप उद्योगपतींच्या संपत्तीत अब्जावधी डॉलर्सची वाढ झाली आहे, तर 2020 पासून महामारीच्या काळात भारतात 40 दशलक्षाहून अधिक लोक दारिद्र्य रेषेच्या खाली गेले आहेत.
यापूर्वी राहुल गांधी यांनी अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणाबाबत केंद्रावर हल्लाबोल केला होता. राहुल गांधींनी ट्विट करून लिहिले की, “आमच्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझली जाईल हे खूप दुःखद आहे. काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत. हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा एकदा प्रज्वलित करू.
Rahul Gandhi attack on the Center again, said – pushed 4 crore people into poverty
महत्त्वाच्या बातम्या
- तस्लिमा नसरीन यांचे आता सरोगसीवर प्रश्न, म्हणाल्या – पालक ‘रेडीमेड चाइल्ड’शी भावनिकरीत्या कसे जोडू शकतात?
- BJP Vs Shiv Sena : आज बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात विरोधकांची पोपटपंची थांबली असती, संजय राऊत यांचा
- धक्कादायक : मुंबईच्या शिवाजीनगरमध्ये 19 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, चार आरोपींना अटक
- राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने अरबीमध्ये केले ट्विट
- Punjab Election : पंजाब लोक काँग्रेसची 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कॅप्टन अमरिंदर सिंग पतियाळातून लढणार