• Download App
    राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले- मोदींच्या काळात आतापर्यंत 5 लाख 35 हजार कोटींची बँक फसवणूक, किसके अच्छे दिन! । Rahul Gandhi attack on Modi government, said- 5 lakh 35 thousand crore bank fraud so far in Modi's time, what a good day

    राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले- मोदींच्या काळात आतापर्यंत 5 लाख 35 हजार कोटींची बँक फसवणूक, किसके अच्छे दिन!

    Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या काळात ५,३५,००० कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. Rahul Gandhi attack on Modi government, said- 5 lakh 35 thousand crore bank fraud so far in Modi’s time, what a good day


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या काळात ५,३५,००० कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

    75 वर्षांत भारतातील जनतेच्या पैशांची एवढी हेराफेरी कधीच झाली नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठी चांगले दिवस आहेत. याच्या एक दिवस आधीही राहुल यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीसाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले होते.

    बेरोजगारीमुळे आत्महत्या वाढल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. बेरोजगारी कशामुळे वाढली? या बेरोजगारी आणीबाणीला केंद्र सरकार जबाबदार आहे.

    ट्विटशिवाय राहुल गांधी यांनी एक लेखही शेअर केला आहे. ज्यामध्ये 2018 ते 2020 दरम्यान बेरोजगारी आणि कर्जामुळे 25,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं.

    बुधवारीच केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, देशात बेरोजगारीमुळे अनेकांनी आपला जीव दिला आहे. ते राज्यसभेत म्हणाले की, मागच्या काही वर्षांत दिवाळखोरपणा आणि कर्जात बुडाल्याने जीव देणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

    Rahul Gandhi attack on Modi government, said- 5 lakh 35 thousand crore bank fraud so far in Modi’s time, what a good day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!