• Download App
    राहुल गांधींनी विचारला 20000 कोटींचा हिशेब; अदानी समूहाने दिला 23500 कोटींचा तपशील!! Rahul Gandhi asked for an account of 20000 crores

    राहुल गांधींनी विचारला 20000 कोटींचा हिशेब; अदानी समूहाने दिला 23500 कोटींचा तपशील!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील राजकीय संघर्षात काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी अदानी समूहाला टार्गेट करत त्यांच्या शेल कंपनीत ₹20000 कोटी रुपये आले कुठून??, असा सवाल सातत्याने लावून धरला आहे. त्यावर देशभरात राजकीय गदारोळ सुरू असताना अदानी समूहाने मात्र ₹23500 कोटींचा हिशेब मांडला आहे!! हे ₹23500 कोटी रुपये अदानी समूहाचे वेगवेगळे स्टेक्स अर्थात हिस्सेदारी गेल्या 4 वर्षांत विकल्यामुळे जमा झाले आणि त्यापैकी ₹20900 कोटी रुपये अदानी समूहाच्या व्यवसाय विस्तारातच गुंतविले, असे स्पष्टीकरण समूहाने दिले आहे. Rahul Gandhi asked for an account of 20000 crores

    पैसे आले कसे?

    2019 पासून अदानी समूह आपल्या कंपन्यांमधील स्टेक्स टप्प्याटप्प्याने विकत आला. त्यातून $2.87 अब्ज डॉलर्स म्हणजेच 23500 कोटी रुपये मिळाले. यातले $2.55 अब्ज डॉलर्स म्हणजेच ₹20900 कोटी रुपये अदानी समूहाच्या व्यवसाय विस्तारात पुन्हा गुंतविले, असे स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले आहे.



    गुंतवणूक झाली कशी?

    अबुधाबी मधील स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग्ने अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी मध्ये $259 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 21000 कोटी रुपये गुंतविले, तर अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी मधील स्टेक्स अर्थात हिस्सेदारी विकून $2.78 अब्ज डॉलर्स अर्थात 22700 कोटी रुपये उभारले आहेत. हा सर्व व्यवहार पारदर्शी असल्याचे समूहाचे म्हणणे आहे.

    राहुल गांधींचे प्रश्न आणि राजकीय गदारोळ

    अदानी समूहाच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुठून आले? ते एलआयसी अथवा कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून पैसे गुंतवले का?, असे अनेक सवाल राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी केले होते. या मुद्द्यावर त्यांनी मोदी सरकारवर त्याने ठपका ठेवला होता. सरकारने यासंदर्भात अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. भाजपच्या नेत्यांनी मात्र पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळे खुलासे केले तरी देखील राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने टार्गेट करत राहिले.

    पवारांकडून काँग्रेसची गोची

    दरम्यानच्या काळात शरद पवारांनी अदानी समूहाची बाजू उचलून धरत गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण बिघडवू नये, असे काँग्रेसला सुनावले. त्या मुद्द्यावरूनही मोठा गदारोळ झाला. पवारांनी काँग्रेसची राजकीय गोची केल्याचे बोलले गेले. पण एवढे होऊनही अदानी समूहाने आत्तापर्यंत कोणताही खुलासा केलेला नव्हता. मात्र, व्यवसाय विस्तारासाठी नेमकी किती गुंतवणूक केली आणि ते पैसे कुठून उभे केले यासंदर्भातले आकडेवारी सह स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपाचा आधार फायनान्शियल एक्सप्रेस मधली एक बातमी होती. त्या बातमीचाही अदानी समूहाने स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.

    Rahul Gandhi asked for an account of 20000 crores

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!