• Download App
    सत्तेचा नाही अजून पत्ता तरी मुख्यमंत्रीपदाची वाढली स्पर्धा; महाराष्ट्र - कर्नाटकात सारखाच कित्ता!!|Race got speed for chief ministership in maharashtra and karnataka

    सत्तेचा नाही अजून पत्ता तरी मुख्यमंत्रीपदाची वाढली स्पर्धा; महाराष्ट्र – कर्नाटकात सारखाच कित्ता!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सत्तेचा नाही अजून पत्ता, तरी मुख्यमंत्री पदाची वाढली स्पर्धा; महाराष्ट्र कर्नाटक सारखाच कित्ता!! हे खरंच घडते आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा वाढली आहे. दोन्ही राज्यांमध्ये दोन्ही पक्षांकडे हातात सत्ता नाही कर्नाटकात विधानसभेची निवडणूक सुरू झाली आहे, पण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक अजून दीड वर्षांनी आहे तरी देखील मुख्यमंत्री पदाची स्पर्धा दोन्ही पक्षांमध्ये समान आहे किंबहुना दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धक मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी फार फार उताविळ झाले आहेत.Race got speed for chief ministership in maharashtra and karnataka

    कर्नाटकात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याबरोबर जी सर्वेक्षणे आली त्यामध्ये काँग्रेसला मोठी संधी असल्याचे दिसून आले आणि त्याबरोबर डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या स्पर्धा वाढली. डी. के. शिवकुमारांनी सिद्धरामय्यांचा काटा काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणून सोडले.

    आता सिद्धरामय यांनी जाहीर मुलाखत देऊन आपण मुख्यमंत्री झालो, तर कर्नाटक मधल्या जनतेला अमूल दूध खरेदी करू देणार नाही, असे जाहीर आव्हान दिले. यातून आपण किती कट्टर मोदी विरोधक आहोत हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला.

    पण कर्नाटकात सध्या वारे फिरल्याचे चित्र आहे. आधीच्या सर्वेक्षणात काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचा दावा केला गेला असला तरी आता स्थिती बदलून ती भाजपला अनुकूल असल्याचे दाखविले जात आहे. अजून तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा खऱ्या अर्थाने प्रचारात उतरायचे आहेत, तरी देखील भाजपच्या दिशेने वारे वाहू लागल्याचे सर्वेक्षण सांगते आहे. तिथे पंतप्रधान मोदी शाह आणि नड्डा सांगतील ते मुख्यमंत्री ही वस्तुस्थिती आहे.

    जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदीव या माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भाजप सोडूनही तिथे भाजप नेतृत्वाला फारसा फरक पडलेला नाही. भाजपचे नेते त्यांच्या विशिष्ट नियोजनानुसार प्रचारात उतरल्याचे दिसत आहे. त्या उलट सर्वेक्षणातून थोडीफार सत्तेची चाहूल लागतात. काँग्रेसमध्ये मात्र मुख्यमंत्रीपदाचे तीन स्पर्धक तयार झाले आहेत.

    मुख्यमंत्रीपदाच्या रिंगमध्ये अजितदादांची हॅट

    महाराष्ट्रात अजितदादांनी मुख्यमंत्री पदाच्या रिंगमध्ये आपली हॅट मोकळेपणाने टाकून दिली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थिर आहे. या सरकारला मोदी सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. भरभक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे इतक्यात हे सरकार न्यायालयाच्या मार्गाने देखील हटण्याची शक्यता नाही, तरी देखील अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आपले हॅट टाकून आपण किती उतावीळ आहोत हे दाखवून दिले आहे.

    अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षाची भाजपच्या नेत्यांनी खिल्ली उडवली आहे, तर काँग्रेस नेत्यांनी खोडा घालून ठेवला आहे. अजितदादांना पृथ्वीराज बाबांबरोबर सरकार चालवायचेच नव्हते तर शपथच घ्यायची नव्हती. उपमुख्यमंत्री पदावर राहून खदखद व्यक्त कशाला करायची?, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

    ठाकरे गटाचा नकारात्मक प्रतिसाद

    शिवसेनेच्या ठाकरे गटातूनही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला हवाल मिळण्याची सुताराम शक्यता नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खानदेशात सभा होणार आहे. त्यावेळी ते अजितदादांच्या महत्त्वाकांक्षेवर काय बोलतील?, याची उत्सुकता आहेच. पण शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तरी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडण्याची सुतराम शक्यता नाही. बाकी राष्ट्रवादी मधून अजितदादांच्या महत्त्वाकांक्षेला सध्या जरी हवा दिली गेली असली, तरी स्वतः शरद पवार जेव्हा खऱ्या अर्थाने मैदानात उतरतील त्यावेळी ती हवा किती वर जाईल आणि केव्हा काढली जाईल?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Race got speed for chief ministership in maharashtra and karnataka

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!