विशेष प्रतिनिधी
मुंबई : बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेच्या खासगी भागात बोट घालणे, हासुद्धा बलात्कारच आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. एका गतिमंद मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल मालाडच्या ३३ वर्षीय आरोपीला सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम केली.Putting a finger in a woman’s private area is also rape, Mumbai High Court decision
संबंधित आरोपीने दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे होती. गतिमंद असलेली तिच्या घराजवळील कालिकामाता मंदिरात गेली होती. तिथून आरोपीने तिला जत्रेत नेले.
त्यानंतर त्याने जत्रेच्या ठिकाणालगत असलेल्या झाडीमध्ये पीडितेला नेले आणि तिच्या खासगी भागात बोट घातले. यानंतर मुलगी रडू लागल्याने त्याने तिला तिच्या घराजवळ सोडले. मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला.
रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या आरोपीकडे बोट दाखवून त्याने तिला कुठे नेले होते, हेही तिने आईला सांगितले. मुलीच्या घरच्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांत तक्रार केली. तपासाअंती आरोपीवर खटला चालवण्यात आला आणि आरोपीला बलात्कार आणि अपहरणप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यास आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यांवरून आरोपीने पीडितेच्या खासगी भागात बोट घातले. त्याची ही कृती भारतीय दंड संहिता कलम ३७५ अंतर्गत करण्यात आलेल्या बलात्काराच्या व्याख्येत बसणारी आहे. तिच्या खासगी भागाला जखम झाल्याचे वैद्यकीय चाचणीत सिद्ध झाले आहे, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने म्हटले.
आरोपीच्या नखांचे डीएनए मॅच झाले आहेत आणि पीडितेला झालेली जखम व तिच्या अंगावर पडलेले मातीचे डाग हे घटनास्थळावरील माती यातही साम्य आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणीही गुन्हा घडल्याच्या २४ तासांत करण्यात आली, याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ती गतिमंद आहे, याकडेही दुर्लक्ष करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Putting a finger in a woman’s private area is also rape, Mumbai High Court decision
महत्त्वाच्या बातम्या
- Ashadhi Wari : पंढरपुरात संचारबंदी, आंतरजिल्हा नाकेबंदीही कडक, इतर जिल्ह्यातून पंढरपुरात एकही एसटी बस न सोडण्याचे महामंडळाचे आदेश
- राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेते, आमचे शिवसेनेशीही वैर नाही; चंद्रकांत पाटील यांचे यूतीबाबत सूचक वक्तव्य
- Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 15 विधेयकं आणण्याची केंद्राची तयारी, डीएनए तंत्रज्ञान विधेयकही आणणार
- कर्नाटकातल्या नेतृत्वबदलाबद्दल मला काही माहिती नाही; पंतप्रधानांच्या भेटीनंतर येडियुरप्पांची प्रतिक्रिया