विनायक ढेरे
तिरूअनंतपूरम : एवढा प्रचाराचा धडाका उडविला… केरळ, तामिळनाडूतल्या मच्छिमारांबरोबर समुद्रतरण केले… केरळमधल्या कॉलेजच्या पोरीशी पुशअप्सची स्पर्धा केली… पण या सगळ्याचा काँग्रेसची political immunity वाढविण्यासाठी लाभ फारसा झाला नाही.Pushups from colleges in Kerala failed to boost the political immunity of the Congress
सुमारे दोन तासांच्या मतमोजणीनंतर सगळे workout चे मुसळ केरात गेले असे म्हणता येणार नाही. राजकीय अब्रू वाचली पण ज्या सत्तेसाठी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मेहनत घेतली होती, ती सत्ता मात्र येताना दिसत नाही.
राहुल गांधी यांची केरळमधली परीक्षा त्यांच्या तथाकथित राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल काँग्रेस अंतर्गत त्यांच्या गोटात जरी चर्चेचा विषय होणार नसली, तरी जी – २३ नेते आणि काँग्रेसबाह्य शक्तींमध्ये ते मोठ्या चर्चेचा विषय ठरणार आहे…
काँग्रेसच्या ५४ खासदारांपैकी १९ खासदार केरळमधून निवडून आले आहेत. तिथे डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे राहुल गांधींना भारी ठरले आहेत.
राज्यातला सत्तेचा लंबक दर पाच वर्षांनी डावी आघाडी – काँग्रेस आघाडी यांच्यात फिरत राहिला होता. तो डाव्या आघाडीच्या दिशेनेच थांबविण्यात पिनरई विजयन यांना यश आल्याचे दिसते आहे.
सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये डावी आघाडी ७८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ५५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राहुल गांधींचा प्रचार फारसा प्रभावी ठरलेला दिसला नाही.
Pushups from colleges in Kerala failed to boost the political immunity of the Congress
महत्वाच्या बातम्या
- सोनू सूदच्या ट्विटनंतर चीन जागेवर आला, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर रोखले नसल्याचा केला दावा
- महाराष्ट्र, दिल्लीचा अपवाद वगळता सर्वच राज्यांनी उभारले स्वत : चे ऑक्सिजन प्लॅँट
- हृदयरोग असलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात
- West bengal assembly elections 2021 results analysis : ममतादीदी हरोत किंवा जिंकोत… त्या बंगालमधून बाहेर पडतील…?? निदान बंगाली अस्मितेचा इतिहास तरी तसे दर्शवत नाही…
- आयर्लंडपासून ते लक्झेम्बर्ग, जपानपर्यंत तब्बल ४० देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले