• Download App
    पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची तयारी; अमरिंद सिंग – नवज्योत सिध्दू यांचे आपापल्या गटांचे शक्तिप्रदर्शन Punjab: Congress leader Punjab congress on the verge of vertical split; Navjot Singh Sidhu met with around 30 sitting MLAs and ministers yesterday

    पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची तयारी; अमरिंद सिंग – नवज्योत सिध्दू यांचे आपापल्या गटांचे शक्तिप्रदर्शन

    वृत्तसंस्था

    चंदीगड – पंजाब काँग्रेस वाचवायचा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हे प्रयत्न करीत असताना त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाशी तडजोड करायला तयार आहेत. Punjab: Congress leader Punjab congress on the verge of vertical split; Navjot Singh Sidhu met with around 30 sitting MLAs and ministers yesterday

    पण नवज्योत सिंग सिध्दू यांच्याशी तडजोडीच्या मूडमध्ये अजिबात दिसत नाहीत. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीष रावत यांना भेटून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपली तडजोडीची मर्यादा किती आहे हे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. दिल्लीतल्या काँग्रेसश्रेष्ठींशी वाद नाही, पण नवज्योत सिध्दूशी तडजोड नाही, ही अमरिंदर सिंग यांची भूमिका आहे.

    अमरिंदर सिंग हे तितकेच आक्रमक आहेत, हे पाहिल्यालवर नवज्योत सिंग सिध्दू हे देखील आपल्या आमदारांची जमवाजमव करण्यात कमी पडलेले दिसत नाहीत. नवज्योत सिंग सिध्दू यांनी कालच आपल्या घरी ३० आमदारांना जमवून मेजवानी देत अमरिंदर सिंग यांच्यापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदापेक्षा खालचे पद आपण स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



    काँग्रेसचे खासदार प्रतापसिंग बाजवा यांनी पंजाबमधल्या सर्व खासदारांना आपल्या घरी निमंत्रण दिले आहे. शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्याचे निमित्त त्यांनी त्यासाठी निवडले असले तरी कॅप्टन आणि सिध्दू वादावर चर्चा करण्याचा आणि मध्येच आपला गट मजबूत करण्याचा खासदार प्रतापसिंग बाजवा यांचा मनसूबा लपून राहिलेला नाही.

    या सगळ्या राजकीय मशक्कतीतून काँग्रेसश्रेष्ठींचा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर आणि संघटनांवर पूर्वीचा धाक अजिबात राहिलेला नाही, हे स्पष्ट होते आहे.

    Punjab: Congress leader Punjab congress on the verge of vertical split; Navjot Singh Sidhu met with around 30 sitting MLAs and ministers yesterday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक