• Download App
    Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले - दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!|Punjab CM Channi challenges Navjot Sidhu to be chief minister for two months in A Meeting

    Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले – दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!

    प्रतिनिधी

    चंदिगड : पंजाब काँग्रेसमधील कलह वारंवार समोर येत आहे. काँग्रेस निरीक्षक हरीश चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि सीएम चरणजीत सिंग चन्नी या दोन्ही नेत्यांमध्ये खटके उडाल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे.Punjab CM Channi challenges Navjot Sidhu to be chief minister for two months in A Meeting

    सूत्रांनी सांगितले की, चन्नी यांनी सिद्धू यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री होऊन दाखवावे आणि उर्वरित कार्यकाळात काम करून दाखवावे.पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू आता नवीन मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांना विरोध करत आहेत.



    रविवारी नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यात झालेल्या बैठकीत मोठा वाद झाला. सूत्रांनुसार, रविवारी बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीत सिद्धू यांचे वागणे पाहून चन्नी यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी असल्याचे बोलून दाखवले.

    मला मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे- चरणजीत सिंह चन्नी

    चरणजीत सिंह चन्नी बैठकीत म्हणाले की, “मला मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे. नवज्योत सिद्धूने मुख्यमंत्री व्हावे आणि 2 महिन्यांत काम करून दाखवावे. या बैठकीला काँग्रेसचे निरीक्षक हरीश चौधरी, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कृष्णा अल्लावरू आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री परगट सिंह उपस्थित होते.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्राच्या 13 कलमी अजेंड्याचा मुद्दा उपस्थित केला. सिद्धू यांनी चन्नींना विचारले की, ज्या आश्वासनांसाठी त्यांना पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनवण्यात आले,

    ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागी का पूर्ण करत नाही. यानंतर हे प्रकरण इतके वाढले की, याचे वादात रूपांतर झाले. तथापि, चन्नी यांच्या या पवित्र्यावर सिद्धूंचे म्हणणे अद्याप समोर आलेले नाही.

    Punjab CM Channi challenges Navjot Sidhu to be chief minister for two months in A Meeting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!