• Download App
    PROUD NEWS :पाकिस्तानात पहिली हिंदू महिला अधिकारी; सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात CSS परीक्षा पास|PROUD NEWS : Hindu girl Sana Gulwani has passed the most difficult administrative service exam in Pakistan

    PROUD NEWS :पाकिस्तानात पहिली हिंदू महिला अधिकारी; सना गुलवानी पहिल्याच प्रयत्नात CSS परीक्षा पास

    विशेष प्रतिनिधि

    इस्लामाबाद: पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू समाजातील मुलगी अधिकारी झाली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. पाकिस्तानात सर्वात अवघड असलेल्या अधिकाऱ्यांच्या CSS परीक्षेत सनाने बाजी मारली आहे.सना रामचंद्र गुलवानी असं या मुलीचं नाव आहे. सना ही 37 वर्षांची असून तिने पहिल्याच प्रयत्नात ही बाजी मारली आहे. PROUD NEWS : Hindu girl Sana Gulwani has passed the most difficult administrative service exam in Pakistan

    कोण आहे सना गुलवानी?

    सना ही शिकारापूर या पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातील रहिवासी आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिने सिंध प्रांतातूनच या परीक्षेसाठी अर्ज केला होता. आधीपासूनच सरकारी अधिकारी होण्याच्या इच्छेने प्रेरित असलेल्या सनाने, या परीक्षेची जोरदार तयारी केली.



    विशेष म्हणजे सना ही डॉक्टर आहे. याआधी तिने बेनझिर भुत्तो वैद्यकिय विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसीनची पदवी घेतली आहे. त्यानंतर ती सर्जन झाली. युरॉलॉजी विषयात तिने मास्टर डिग्री मिळवली आहे.

    पाकिस्तानात सर्वात कठीण परीक्षा

    आपल्याकडे ज्याप्रकारे UPSC परीक्षा पास होणं अवघड आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानात सेंट्रल सुपिरिअर सर्व्हिसेस म्हणजेच CSS ही परीक्षा अवघड मानली जाते. पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेत येण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होण गरजेचं आहे. या परीक्षेसाठी सना गेल्या काही वर्षांपासून कठीण परिश्रम घेत होती

    . सना ही शिख धर्मालाही खूप मानते, त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने ‘वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरुजी दी फतेह’ म्हटलं. पाकिस्तानातील ही परीक्षा इतकी कठीण आहे की, परीक्षेला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या फक्त 2 टक्के विद्यार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण होतात. अनेकदा परीक्षा देऊनही, अनेकांचं अधिकारी बनण्याचं स्वप्न अर्धवटच राहतं, मात्र सनाने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत बाजी मारली आहे.

    PROUD NEWS : Hindu girl Sana Gulwani has passed the most difficult administrative service exam in Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र