विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशियाची लस स्पुटनिकच्या आयातीनंतर आता या लसीचे उत्पादन भारतात लवकरच सुरू होणार आहे. ऑगस्टपासून भारतात स्पुटनिक चे उत्पादन सुरू होईल. या संपूर्ण प्रक्रियेतून ८५ कोटी डोस लस उत्पादन अपेक्षित आहे. ऑगस्टपासून उत्पादन सुरु होऊ शकते.Production of sputnik will start in India soon
भारतात स्फुटनिक लसीचे वितरण सुरू होणार आहे. आता या लसीचे भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी रशियाने सर्वतोपरी मदत देऊ केली आहे. स्पुटनिक लस भारतात तीन टप्प्यात उपलब्ध होणार असून
कच्चा माल पुरवठा तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण यासाठी रशियातर्फे मदत केली जाईल. पहिल्या टप्प्यात लस पुरवठा सुरू झाला आहे. या महिनाअखेर ३० लाख डोस तर जूनमध्ये ५० लाख डोस स्पुटनिक लसीचे मिळतील.
दुसऱ्या टप्प्यात आरडीआयएफ हा कच्चा माल घाऊक प्रमाणात भारतात पाठविण्यात येईल. लस उत्पादनात या साठवलेल्या कच्च्या मालाची मदत होईल आणि त्यानंतर भारतीय कंपन्यांकडे रशिया तर्फे तंत्रज्ञान हस्तांतरित केले जाईल.