विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील विविध ठिकाणी झालेल्या धर्मसंसदांमध्ये मुस्लिामांबाबत विद्वेष पसरविणाऱ्या हिंदूत्ववादी नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करावा, अशी मागणी देशातील शंभर मान्यवरांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे. प्रक्षोभक भाषणांचा आम्ही निषेध करतो असेही त्यांनी म्हटले आहे.Pro-Hindu leaders spreading anti-Muslim hatred should be publicly protested, letter from 100 dignitaries to President and PM
हरिद्वार, दिल्ली व अन्य काही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत हिंदुत्ववादी नेत्यांनी मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणारी वक्तव्ये केली आहेत. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा भडक वक्तव्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करावा.
दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, असे पत्र पाच माजी नौदल, हवाई दलप्रमुखांसह १०० मान्यवरांनी या दोघांना लिहिले आहे. यामध्ये माजी नौदलप्रमुख अॅडमिरल एल. रामदास, अॅडमिरल विष्णू भागवत, अॅडमिरल अरुण प्रकाश, अॅडमिरल आर. के. धोवान, माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी तसेच माजी सनदी अधिकारी, पत्रकार, वकील, अर्थतज्ज्ञ यांचाही समावेश आहे.
या पत्रात म्हटले आहे की, हरिद्वार येथे झालेल्या तीन दिवसीय धर्मसंसदेत हिंदुत्ववादी नेते व साधू-संतांनी जी प्रक्षोभक भाषणे केली, त्याचा आम्ही निषेध करतो. भारतात हिंदू राज्य स्थापन करायचे असून, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हत्यारे बाळगा, हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट समुदायाचे शिरकाण करा,
अशी भयंकर वक्तव्ये या नेत्यांनी केली आहेत. म्यानमारप्रमाणे पोलीस, लष्कर व प्रत्येक हिंदूने हत्यारे बाळगावीत व एका समुदायाचा नरसंहार करावा, असे उद्गार हिंदू रक्षा सेनाचे स्वामी प्रबोधानंद यांनी धर्मसंसदेत केले होते.देशाच्या सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे.
अशा स्थितीत देशात काही मंडळी करत असलेल्या भडक वक्तव्यांमुळे बाह्यशक्तींना हातात आयते कोलीत मिळू शकेल. पोलीस असो वा लष्कर त्यांच्यामध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेला चिथावणीखोर भाषणांमुळे तडा जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रकारांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.
Pro-Hindu leaders spreading anti-Muslim hatred should be publicly protested, letter from 100 dignitaries to President and PM
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा
- मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिली जॅकलीनसोबतच्या संबंधांची कबुली
- सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली
- त्रिपुरातील बांग्ला देशींची घुसखोरी कायमची थांबणार, भारत- बांग्ला देश सीमेवर कुंपण उभारले जाणार