• Download App
    प्रियांका गांधींना फक्त राजकीय पोळ्यात भाजण्यात रस; काँग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांचा हल्लाबोल |Priyanka Gandhi is only interested in roasting in the political hive; Congress MLA Aditi Singh's attack

    प्रियांका गांधींना फक्त राजकीय पोळ्या भाजण्यात रस; काँग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    लखनऊ : कृषी कायदे मागे घेणे असो अथवा लखीमपुर हिंसाचाराचा मुद्दा असो काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना फक्त राजकीय पोळ्या भाजण्यात रस आहे, असा परखड हल्लाबोल काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधल्या बंडखोर आमदार आदिती सिंग यांनी केला आहे.Priyanka Gandhi is only interested in roasting in the political hive; Congress MLA Aditi Singh’s attack

    २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपची जबरदस्त लाट असताना काँग्रेसच्या तिकिटावर त्या विधानसभेत निवडून आल्या आहेत. आदिती सिंग राजकीयदृष्ट्या बऱ्याच ऍक्टिव्ह आहेत. देशातल्या विविध विषयांवर त्या परखडपणे आपली मते सोशल मीडियावर शेअर करत असतात.


    अखिलेश यादव, प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, पोलिस कोठडीतील मृत्यू भोवणार


    प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जो हल्लाबोल केला आहे, त्या मुद्द्यावरून आदिती सिंग यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, की प्रियांका गांधी यांना कृषी कायदे आणले तेव्हाही प्रॉब्लेम होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत तरीही प्रियंका गांधी यांना प्रॉब्लेम आहे.

    लखीमपूर खीरी इथल्या हिंसाचाराची सीबीआय मार्फत चौकशी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात केस दाखल आहे. तरी देखील प्रियांका गांधी त्यावरून फक्त राजकारण करू इच्छित आहेत. त्यांना कोणतीही समस्या सुटायला नको आहे, तर ती अधिक गुंतागुंतीची कशी होईल आणि आपला त्यात राजकीय फायदा कसा होईल हे त्या पाहत असतात, असे जोरदार टीकास्त्र आदिती सिंग यांनी सोडले आहे.

    Priyanka Gandhi is only interested in roasting in the political hive; Congress MLA Aditi Singh’s attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार