विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे स्वप्न असलेला शरयू प्रकल्पाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाला आहे. सरयू प्रकल्पामुळे 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिन सिंचनाखाली येणार आहे. 6200 हून अधिक गावांतील 29 लाख शेतकºयांना लाभ होणार आहे.Prime Minister Narendra Modi’s visit to farmers, completion of Sharyu project, 14 lakh hectare area will come under irrigation
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे चार वर्षांत पूर्ण झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरयू नहर राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन केले.
शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
घागरा, शरयू, राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी या पाच नद्यांना जोडण्याचं काम या प्रकल्पामार्फत होणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. या प्रकल्पामुळं 6200 हुन जास्त गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल.
त्यात बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, गोंडा, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, गोरखपूर आणि महाराजगंज या जिल्ह्यांचा समावेश आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल.शरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पावर गेल्या गेल्या चार वर्षांत 4600 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आहे.
प्रकल्पातील विलंबाचा त्रास झालेल्या प्रदेशातील शेतकऱ्यांना आता उन्नत सिंचन क्षमतेचा मोठा फायदा होईल, असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पन्न घेण्यास सक्षम होतील आणि प्रदेशाची कृषी क्षमता वाढवू शकतील, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पन्न घेण्यास सक्षम होतील आणि प्रदेशाची कृषी क्षमता वाढवू शकतील.
Prime Minister Narendra Modi’s visit to farmers, completion of Sharyu project, 14 lakh hectare area will come under irrigation
महत्त्वाच्या बातम्या
- पायातील हातात घेऊन ठाकरे सरकारला जाब विचारण्याची वेळ, चिपळूणच्या लोकांचे हाल पाहून राजू शेट्टी संतप्त
- काशी विश्वनाथाच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा गव्हर्नन्सवर विशेष क्लास!!
- काशी विश्वनाथ कॉरिडॉर; विविध देशांचे राजदूत आणि मंत्री संमेलनांचे महत्व; भारतीय संस्कृतीच्या मुख्य धारेची ठळक ओळख!!
- बॅन लिपस्टिक मागची मिस्ट्री संपली! तेजस्विनी पंडितची ‘अनुराधा’ ही वेब सिरीज प्लॅनेट मराठीवर होतेय प्रदर्शित
- पत्नीच्या मर्जी विरुद्ध केलेले कॉल रेकॉर्डिंग, पुरावा म्हणून कोर्टामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही ; हाय कोर्ट