• Download App
    कोरोना महामारीच्या काळात मानवतेसमोर संकट, बुध्दांचे विचारच आपल्यासाठी उपयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन|Prime Minister Narendra Modi's said that the crisis in front of humanity during the Corona epidemic

    कोरोना महामारीच्या काळात मानवतेसमोर संकट, बुध्दांचे विचारच आपल्यासाठी उपयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून यात बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गुरु पौर्णिमाच्या पार्श्वभूमीवर आषाढ पौर्णिमा-धम्म च्रक दिवसाच्या कार्यक्रमात बोलत होते.Prime Minister Narendra Modi’s said that the crisis in front of humanity during the Corona epidemic

    पंतप्रधान म्हणाले की, अशा परिस्थितीत भगवान बुद्ध आपल्यासाठी अधिक प्रासंगिक बनतात. बुद्धाच्या मार्गावर चालून आपण सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकतो. कारण भारताने कोरोना महामारीच्या काळात तसे करुन दाखवले आहे.



    आज जगातील अनेक देशही बुद्धांच्या योग्य विचारांबद्दल एकमेकांचा हात धरुन चालत आहे. सारनाथमध्ये बुद्धांनी आपल्याला संपूर्ण जीवनाचे पूर्ण ज्ञान देण्याचे सूत्र सांगितले होते. त्यांनी आम्हाला दु:खाबद्दल सांगितले. दु:खाचे कारणाबद्दल सांगितले असून त्यावर मात करत विजयाचा मार्ग कसा तयार करायचा हे देखील सांगितले आहे.

    बुद्धाने आपल्याला आयुष्या जगण्यासाठी आठ सूत्र दिले आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. आपल्या आयुष्यात संतुलन असेल तरच आंनद मिळू शकतो असे मोदी म्हणाले.

    Prime Minister Narendra Modi’s said that the crisis in front of humanity during the Corona epidemic

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!