विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील अडीच कोटी लोकांना एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस दिल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला आहे. याचं काही लॉजिक असू शकतं का? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसवर केली आहे.Prime Minister Narendra Modi’s criticism of Congress, After giving a dose of 2.5 crore corona vaccine in the country, a political party started suffering and their fever increased
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले, जेव्हा तुमच्या सांगण्यानंतर नागरिकांनी लस घेतली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला का? मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे.
कारण मी वैज्ञानिक किंवा डॉक्टर नाही. मी असं ऐकलं आहे की लस घेतल्यानंतर १०० पैकी एका व्यक्तीला त्रास होतो. जास्त ताप आल्यानंतर मानसिक संतुलनही बिघडतं असं डॉक्टर सांगतात. पण मला जाणून घ्यायचं आहे की, काल जेव्हा आरोग्य कर्मचाºयांनी अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांना लसीचे डोस दिले आहेत.
त्यापैकी काहींना त्रास झाला हे मी ऐकले आहे. पण हे मी पहिल्यांदाच पाहात आहे की एकाच दिवशी अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यावर एका राजकीय पक्षाचा ताप वाढला आहे.
पंतप्रधान म्हणाले, जेव्हा लोकांना आम्ही लस दिली तेव्हा त्यांना करोनाला रोखण्यासाठी ही लस देत असल्याचे सांगितले. लसीकरणानंतर तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. लस घेतल्यानंतर मास्क घालणे, हात धुणे आणि अंतर राखणे हे सुरुच ठेवायचे आहे.
तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारताने एका दिवसात अडीच कोटी लसींचा जागतिक विक्रम केला आहे. जगातील अनेक मोठे सक्षम देश सुद्धा असा विक्रम करू शकले नाहीत. अनेक वाढदिवस आले, अनेक वाढदिवस गेले. वाढदिवस साजरा करण्याचे अनेक प्रकार आहेत पण तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे खूप खास होते. वैद्यकीय क्षेत्रातील लोक रात्रंदिवस मेहनत करत आहेत. काल केलेला लसीकरणाचा विक्रम ही मोठी गोष्ट आहे.
Prime Minister Narendra Modi’s criticism of Congress, After giving a dose of 2.5 crore corona vaccine in the country, a political party started suffering and their fever increased
महत्त्वाच्या बातम्या
- चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, राखी सावंतचा आपचे नेते राघव चढ्ढा यांना इशारा
- देशाच्या न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण व्हावे, सध्याच्या वसाहतकालीन नियमांनी भारतीयांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, सरन्यायाधीश रमणा यांचे आवाहन
- कोल्हापुरातील साहित्यिका सोनाली नवांगुळ यांना २०२० साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार जाहीर. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ह्या अनुवादित कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर.
- कोकणसह विदर्भातही येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे