वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर राजधानीत जोरदार खलबते सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. Prime Minister Narendra Modi is holding a meeting with Union Ministers Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, and BJP chief JP Nadda, at his official residence
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात बदल आणि विस्तारावर चर्चा सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असून ते मुंबईतून दिल्लीला रवाना झाल्याची बातमी आहे. त्यांच्या बरोबरीने भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांचेही नाव संभाव्य केंद्रीय मंत्र्यांच्या यादीत आघाडीवर आहे.
मोदींच्या निवासस्थानी वरिष्ठ मंत्र्यांची होत असलेली ही दुसरी बैठक आहे. आधीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. तिला अमित शहा आणि जे. पी. नड्डा हे दोनच नेते उपस्थित होते. आत्ताच्या बैठकीत राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना देखील सहभागी करवून घेण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आणखी ज्येष्ठ सहकार्यांना सहभागी करवून घेतल्याचे बोलले जात आहे.
मोदी हे स्वतः एकटेच निर्णय घेतात. ते अनेकांना सप्राइज देतात, अशी राजधानीच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा असते. पण त्या चर्चेला छेद देण्याच्या दृष्टीने मोदींनी आपल्या सहकार्यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत सहभागी करवून घेतल्याचे बोलले जात आहे. यात मंत्र्यांच्या संभाव्य नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Prime Minister Narendra Modi is holding a meeting with Union Ministers Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, and BJP chief JP Nadda, at his official residence