• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबरला गोव्यात; मुक्ती दिनाच्या 60 व्या वर्धापनाचा भव्य कार्यक्रम |Prime Minister Narendra Modi in Goa on December 19; A grand celebration of the 60th anniversary of Liberation Day

    पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबरला गोव्यात; मुक्ती दिनाच्या ६० व्या वर्धापनाचा भव्य कार्यक्रम

    वृत्तसंस्था

    पणजी : गोवा मुक्ती दिनाच्या 60 व्या वर्धापन दिनाचा 19 डिसेंबर रोजी घेण्यात येत असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत पणजी मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये हा भव्य कार्यक्रम होणार असून पंतप्रधान या दिवशी गोवेवासियांना संबोधित करतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली आहे.Prime Minister Narendra Modi in Goa on December 19; A grand celebration of the 60th anniversary of Liberation Day

    पंतप्रधान मोदी हे दुपारी दोन वाजता आझाद मैदान येथे पोहोचतील आणि तीन वाजता मुख्य कार्यक्रम डॉ. मुखर्जी स्टेडियममध्ये होईल, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गोव्यात आहेत.



    त्यांनी काल दिवसभर गोव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन केले. त्याचप्रमाणे गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा पोलिसांच्या पिंक सर्व्हिस फोर्सचे उद्घाटन करण्यात आले. महिलांनी तक्रार दाखल करताच काही मिनिटांमध्येच हा पिंक सर्विस फोर्स त्यांच्या सुटकेसाठी दाखल होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

     ममता, प्रियांका यांच्यानंतर मोदींचा दौरा

    गोव्यात 2022 च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणुका अपेक्षित विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गोव्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ममता बॅनर्जी यांचे दोन गोवा दौरे झाले आहेत, तर प्रियांका गांधी यांचा एक गोवा दौरा झाला आहे.

    या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या दौऱ्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या गोव्या दौऱ्यावर येत आहेत. गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमास संदर्भातला हा दौरा असला तरी भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने मनोधैर्य वाढवणारा हा दौरा असणार आहे.

    Prime Minister Narendra Modi in Goa on December 19; A grand celebration of the 60th anniversary of Liberation Day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार