प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रीराम मंदिराचे लोकार्पण सध्या होत आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून स्वागताचा स्वीकार केला. आता सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तिघांच्या एकत्र फोटोची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
Prime Minister Modi’s welcome from Ajit pawar Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. या तिघांना एकत्र फोटो निकाल निघाला आहे. या फोटोची चर्चा महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया मध्ये सुरू आहे.
– 400 वारकऱ्यांसोबत लोकार्पण सोहळा
नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टरने देहूत आले. यासाठी झेंडे मळा येथे 3 हेलिपॅड तयार करण्यात आले. येथे 400 वारकऱ्यांसमवेत लोकार्पण सोहळा होत आहे. या सोहळ्यानंतर पुन्हा मोटारीने सभास्थानी येतील. येथे 22 एकरात मंडप उभारण्यात आला आहे. मध्यभागी दोन मोठे मंडप, स्टेज असून डावी आणि उजवीकडे दोन लहान मंडप टाकण्यात आले आहेत.
मोदी-उद्धव ठाकरे एकाच मंचावर
देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचे उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर दिसणार आहेत.
Prime Minister Modi’s welcome from Ajit pawar Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात एकटे पडले काँग्रेसचे युवराज, राहुल गांधींना विरोधकांची मिळाली नाही साथ
- राजभवनातील भुयार क्रांतिकारक गॅलरीतून सावरकरांसह असंख्य क्रांतिकारकांना वंदन; उद्या मोदींच्या हस्ते उद्घाटन
- नॅशनल हेराल्ड केस : “झुकेगा नही” म्हणणारा काँग्रेसचा “पुष्पा” पोलिसांना घाबरून पळाला!!
- ओबीसी एम्पिरिकल डाटा : फडणवीसांच्या शंकेला भुजबळ, वडेट्टीवार यांचा दुजोरा!!; प्रकरणाचे नेमके गंभीर्य काय??