• Download App
    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : दोन राष्ट्रपतींचे अगत्य; आर. वेंकटरमण - राजीव गांधी; रामनाथ कोविंद - नरेंद्र मोदी!! President Ram Nath Kovind met PM Narendra Modi at Rashtrapati Bhavan today and received

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : दोन राष्ट्रपतींचे अगत्य; आर. वेंकटरमण – राजीव गांधी; रामनाथ कोविंद – नरेंद्र मोदी!!

    पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळणे, तिचे उल्लंघन होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. आज सोशल मीडियाच्या जमान्यात त्यावरून कितीही राजकीय गदारोळ सुरू असला आणि त्यामध्ये पक्षीय राजकारण आणून एकमेकांमध्ये चिखलफेक करण्यात येत असली तरी त्या पलिकडे जाऊन पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे कसे गांभीर्याने पाहिले पाहिजे, याची उदाहरणे दोन राष्ट्रपतींनी आपल्या आचरणातून घालून दिली आहेत.President Ram Nath Kovind met PM Narendra Modi at Rashtrapati Bhavan today and received

    आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर बद्दल चिंता व्यक्त केल्याची बातमी आली आहे. ही बातमी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उठून राष्ट्रपतींच्या भेटीला राष्ट्रपती भवनात गेले आहेत. ते राष्ट्रपतींशी चर्चा करताहेत. देशात गंभीर कायदेशीर राजकीय हालचाली सुरू आहेत, याचे हे निदर्शक आहे.

    परंतु राष्ट्रपतींची पंतप्रधानांशी या स्वरूपाची पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचे संदर्भात भेट होणे ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अशी घटना घडली आहे. ती त्यावेळचे राष्ट्रपती आर. वेंकटरमण आणि त्या वेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाबतीत घडली आहे. पंतप्रधान राजीव गांधी हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी श्रीलंकेच्या नौसैनिकाने त्यांच्यावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला केला होता. त्यावेळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता. परंतु त्या वेळचे दूरदर्शन चित्रीकरण आत्ता युट्युबवर उपलब्ध आहे. राजीव गांधींनी चपळाई दाखवून या हल्ल्यातून आपला बचाव केला होता. त्यानंतर राजीव गांधींनी व्यवस्थितपणे आपला श्रीलंका दौरा आटोपला आणि ते नवी दिल्लीला परत आले. त्यावेळी राष्ट्रपती आर वेंकटरमण यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून विमानतळावर जाऊन राजीव गांधी यांचे स्वागत करुन भेट घेतली होती. त्यांची विचारपूस केली होती. हे अगत्य त्यावेळी वेंकट रमण यांनी दाखविले. वेंकटरामन यांचे आत्मचरित्र “माय प्रेसिडेन्शियल इयर्स”मध्ये या घटनेचे तपशीलवार उल्लेख आहेत.

    तसेच अगत्य आज रामनाथ कोविंद यांनी दाखविले आहे. फक्त फरक एवढा आहे की वेंकटरमण हे राजीव गांधी यांची भेट घ्यायला त्यावेळच्या परिस्थितीनुसार विमानतळावर गेले होते. तर पंतप्रधान मोदी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला राष्ट्रपती भवनात गेले आहेत.

    President Ram Nath Kovind met PM Narendra Modi at Rashtrapati Bhavan today and received

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य