• Download App
    प्रशांत किशोर आज पासून बिहारच्या 3500 किलोमीटर पदयात्रेवर; पण पावले कुणाच्या पावलांवर??|Prashant Kishor to embark on 3,500 km padayatra in Bihar from tomorrow

    प्रशांत किशोर आज पासून बिहारच्या 3500 किलोमीटर पदयात्रेवर; पण पावले कुणाच्या पावलांवर??

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे इतरांसाठी निवडणूक रणनीती तयार करण्याचे काम सोडून देऊन प्रत्यक्षात स्वतःसाठीच एक रणनीती तयार करून आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंती पासून बिहारच्या पदयात्रेवर निघाले आहेत. संपूर्ण राज्यभर तब्बल 3500 किलोमीटर होणारी ही पदयात्रा पुढची 2.5 वर्षे चालेल. या पदयात्रेची महत्त्वाकांक्षी योजना अन्य कोणी नव्हे, तर स्वतः प्रशांत किशोर यांनीच तयार केली आहे. बिहारच्या राजकारणात स्वतःची ताकद निर्माण करण्यासाठी ही पदयात्रा उपयोगी पडणार असल्याचा त्यांचा होरा आहे.Prashant Kishor to embark on 3,500 km padayatra in Bihar from tomorrow

     राहुल गांधींची भारत जोडो यात्रा

    एकीकडे देशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा आहे. केरळ आणि तामिळनाडू मधली यात्रा आटोपून भारत जोडो यात्रेने कर्नाटकात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्यासारखा नव्याने होऊ घातलेला तरुण नेता बिहारपुरतीच मर्यादित परंतु राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे इतकीच अंतराने लांब म्हणजे 3500 किलोमीटरची यात्रा काढत आहे.



     प्रशांत किशोर यांची महत्त्वाकांक्षा

    पाटण्यापासून तब्बल 500 गाड्यांचा ताफा घेऊन प्रशांत किशोर उद्या पश्चिम चंपारण मध्ये पोहोचतील. हेच ते चंपारण आहे, जिथे महात्मा गांधींनी सत्याग्रह केला होता. तेथून प्रशांत किशोर आपल्या महत्त्वाकांक्षी जनसुराज्य पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. सध्या बिहार विधान परिषदेचे अपक्ष सदस्य सच्चिदानंद राय त्यांच्या साथीला असणार आहेत. परंतु पदयात्रा पुढे जसजशी सरकेल तस तसे बिहार मधल्या प्रत्येक पंचायत क्षेत्रातील किमान 150 कार्यकर्ते आपल्या पदयात्रेशी जोडून घेण्याचा प्रशांत किशोर यांचा मानस आहे. येत्या 2.5 वर्षात त्यांच्या जनसुराज्य मोहिमेत 2 लाख कार्यकर्ते जोडून घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

     स्वतःसाठी प्रथमच रणनीती

    “विकसित बिहार” हा प्रशांत किशोरी यांच्या जनसुराज्य यात्रेचा “मोटो” आहे. आत्तापर्यंत प्रशांत किशोर यांनी भाजपपासून नितीश कुमार यांच्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांसाठी निवडणूक रणनीती तयार केली. त्यात ते काही वेळा यशस्वी झाले. बिहार मधल्या पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच स्वतःसाठी निवडणूक प्रणयुती रणनीती तयार केली आहे आणि या रणनीती द्वारे ते प्रथमच स्वतःचे राजकीय भवितव्य आजमावत आहेत.

    500 गाड्यांच्या ताफ्याचे शक्तिप्रदर्शन

    राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत कंटेनरच्या गावाचा खूप बोलबाला होतो आहे. 60 कंटेनर त्यांच्याबरोबर नियमितपणे राहुन यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर एक गाव तात्पुरते वसवत असतात. प्रशांत किशोर यांच्या बिहार मधल्या जनसुराज्य पदयात्रेत सुरुवातीलाच 500 गाड्यांचा ताफा असणार आहे. टप्प्याटप्प्याने ही यात्रा पुढे सरकणार आहे.

    जगन मोहन, केजरीवालांच्या यात्रा यशस्वी

    राज्यव्यापी यात्रा या दृष्टीने विचार केला, तर आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर 2700 किलोमीटरची रयतू यात्रा काढली होती. तशीच यात्रा दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील काढली होती. नजीकच्या राजकीय भूतकाळात पाहिले, तर या दोन नेत्यांच्या यात्रांशी प्रशांत किशोर यांच्या बिहार पदयात्रेशी तुलना होऊ शकते. जगन मोहन रेड्डी आणि अरविंद केजरीवाल हे आपल्या राजकीय मोहिमेत यशस्वी झाले. प्रशांत किशोर यांची बिहार जनसुराज्य यात्रा त्यांचे भवितव्य कशा पद्धतीने घडवेल हे 2.5 वर्षांनंतर 2025 च्या उत्तरार्धात समजणार आहे.

    Prashant Kishor to embark on 3,500 km padayatra in Bihar from tomorrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य