• Download App
    Prashant Kishor : काँग्रेस गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत; प्रशांत किशोर - राहुल, प्रियांका चर्चा!! । Prashant Kishor : Congress preparing for Gujarat Assembly elections

    Prashant Kishor : काँग्रेस गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत; प्रशांत किशोर – राहुल, प्रियांका चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न करत गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी चालवली आहे. Prashant Kishor : Congress preparing for Gujarat Assembly elections

    कालच गुजरात मध्ये प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची फेररचना तसेच निवडणूक तयारीसाठी जबाबदारी वाटप निश्चित करण्यात आले असून काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या परवानगीने तब्बल 80 जणांची यादी जाहीर केली आहे.

    मात्र त्यापेक्षा महत्त्वाचे घडामोड घडली असून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. प्रशांत किशोर हे गुजरात मध्ये काँग्रेस साठी काम करु शकतात. गुजरातमध्ये सध्या काँग्रेसचे 65 आमदार आहेत. भाजपचे 2018 च्या निवडणुकीत 99 आमदार निवडून आले होते. परंतु भाजपची आमदार संख्या सध्या 109 आहे. काँग्रेस मधून अनेक आमदार फुटून भाजपमध्ये आले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मध्ये जोरदार हालचाली सुरू असून हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, सत्यजित सिंग गायकवाड या नेत्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात येत आहे.



    त्याच वेळी निवडणूक करण्याची ठरवण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेण्यात येऊन मोदी – शहा यांच्या गुजरातमध्ये भाजपला हरवण्याची रणनीती आखण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याची पुष्टी दोन्ही नेत्यांनी दिली. परंतु चर्चेचे तपशील मात्र कोणी सांगितले नाहीत.

    गुजरात विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे करण डिसेंबरमध्ये विधानसभेची मुदत पाच वर्षांची मुदत संपली आहे या पार्श्वभूमीवर मोदी आणि शहा यांचे गृहराज्य गुजरातमध्येच भाजपला तडाखा द्यायचा काँग्रेसने मनसुबा आखला आहे. त्यासाठीच प्रशांत किशोर यांची मदत प्रत्यक्षात घेण्याचे घाटत आहे.

    अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नसून पश्चिम बंगाल मध्ये देखील प्रशांत किशोर है 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला मदत करायला तयार होते परंतु त्यांचे काँग्रेस बरोबर डील झाले नाही. त्यामुळे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संधान बांधले 2022 च्या अखेरच्या टप्प्यात हिमाचल प्रदेश मध्ये देखील विधानसभा निवडणुका अपेक्षित असून याबाबत देखील प्रशांत किशोर आणि राहुल प्रियंका गांधी यांची चर्चा झाल्याचे समजते.

    Prashant Kishor : Congress preparing for Gujarat Assembly elections

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!