• Download App
    पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे Pradhan Mantri Crop Insurance Scheme brought smiles on the faces of farmers

    पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे

    मोदी सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ही योजना लागू केली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू होऊन आठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे पंतप्रधान पीक विमा  योजनेच्या परिणमांबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कोणती असू शकते. Pradhan Mantri Crop Insurance Scheme brought smiles on the faces of farmers

    राज्यसभा खासदार राम चंदर जांगरा यांनी एका ट्विटमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेच्या फायद्यांविषयी सांगितले होते. राज्यसभा खासदाराच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; ” पंतप्रधान पीक विमा योजनेने आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर जे हास्य पसरले आहे, त्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो!”

    मोदी सरकारने १३ जानेवारी २०६ रोजी ही योजना लागू केली. दरवर्षी पूर, वादळ आणि अतिवृष्टीमुळे देशातील शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. पीक विमा योजनेंतर्गत, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे, म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा हप्ता भरून, नुकसान एका मर्यादेपर्यंत कमी केले जाईल.

    याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रीमियमची रक्कम खूपच कमी ठेवण्यात आली आहे. विमा हप्त्याची रक्कम खरीपासाठी ५ टक्के आणि रब्बीवर फक्त १.५ टक्के आहे. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी संरक्षक कवच आहे. शेतकर्‍यांच्या हिश्श्याव्यतिरिक्त विमा हप्त्याची किंमत राज्य आणि केंद्र सरकार सहाय्याच्या स्वरूपात समान रीतीने वाटून घेते. ईशान्येकडील राज्यांमध्ये केंद्र सरकार प्रीमियम रकमेच्या ९० टक्के रक्कम देते.

    या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील १७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले आहेत. आधार जोडणीमुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दाव्यांची रक्कम जलद जमा होण्यास मदत झाली आहे. तसेच, या योजनेत शेतकर्‍यांसाठी पेरणीपूर्व ते काढणीनंतर संपूर्ण पीक चक्राचा जोखमीचा समावेश आहे. पेरणी आणि काढणीच्या मध्यावर प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचाही यात समावेश आहे. स्थानिक आपत्ती आणि पूर, ढगफुटी आणि कोरडा दुष्काळ यासारख्या संकटांमुळे वैयक्तिक शेत स्तरावर कापणीनंतरचे नुकसान कव्हर केले जाते.

    Pradhan Mantri Crop Insurance Scheme brought smiles on the faces of farmers

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही