• Download App
    उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; प्रियांकाच्या दौऱ्यात लखनौत प्रदेश कार्यालयात उत्साहाला भरते; स्वागतासाठी पोस्टर्सची गर्दी। Posters and banners welcoming Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra, put up around party's office in Lucknow. She is arriving in the city today, on a three-day visit.

    उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; प्रियांकाच्या दौऱ्यात लखनौत प्रदेश कार्यालयात उत्साहाला भरते; स्वागतासाठी पोस्टर्सची गर्दी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणूकांमध्ये काही काळ active राहिलेले प्रियांका गांधी कार्ड मधल्या काळात deactivate झाले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका जवळ येताच ते पुन्हा active झाले आहे. Posters and banners welcoming Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra, put up around party’s office in Lucknow. She is arriving in the city today, on a three-day visit.

    प्रियांका गांधी या आज लखनौच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी लखनौच्या प्रदेश कार्यालयात पोस्टर्सची गर्दी पाहायला मिळत आहे. लखनौमध्ये प्रदेश कार्यालय परिसरात नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे, पताका लावून प्रियांकांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधल्या इच्छुंकांची जबरदस्त तयारी यातून दिसून येत आहे.



    प्रियांका गांधी यांनी देखील लखनौ दौऱ्यापूर्वी परवा काँग्रेसच्या सल्लागार समितीची आणि व्यूहरचना गटाची (Congress Advisory Council and Strategic Group) बैठक घेतली होती. त्यांना विशेष सूचना दिल्या होत्या.

    अर्थात या बैठकीत काँग्रेसचे उत्तर प्रदेशात नेतृत्व नेमके कोणी करायचे या विषयावरची चर्चा सोडून अन्य सगळ्या विषयांवर चर्चा झाली होती. मध्यंतरी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी प्रियांका गांधी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करून योगी आदित्यनाथ यांना चांगली टक्कर देता येईल, अशी सूचना केली होती. पण त्या सूचनेवर बैठकीत चर्चा झाली की नाही, हे सूत्रांनी सांगितले नाही.

    उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणूकांमध्ये भाजपने हिंसाचार माजविला. दगडफेक केली. गोळ्या चालविल्या आणि निवडणूका जिंकल्या असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी बैठकीत केला. त्यातून काँग्रेसजनांना भाजपवर टीकास्त्र सोडायला एक महत्त्वाचा मुद्दा हाती मिळाल्याचे मानण्यात येत आहे.

    या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी आज लखनौला येत आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करून काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्याचा प्रयत्न केला आहे.

    Posters and banners welcoming Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra, put up around party’s office in Lucknow. She is arriving in the city today, on a three-day visit.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य