विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांच्या भेटीवरून राजकारण तापले आहे. तृणमूल कॉंग्रेसने राष्ट्रपतींकडे तुषार मेहता यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.Politics in west Bengal erupts
तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन तुषार मेहता यांना सॉलिसिटर जनरल पदावरून हटविण्याची मागणी केली. पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितले, राष्ट्रपतींची भेट घेऊन तुषार मेहता यांचा अशोभनीय वर्तनाबद्दल तातडीने राजीनामा घेतला जावा, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.
याआधी, सुवेंदु अधिकारी आणि तुषार मेहता यांच्या कथित भेटीवरून तृणमूल कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या लाचखोरीच्या नारदा प्रकरणात तसेच शारदा चिटफंड गैरव्यवहारातील आरोपी असलेले सुवेंदु अधिकारी यांनी तुषार मेहता यांना भेटून न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही तृणमूल कॉंग्रेसचा आरोप आहे.
अधिकारी यांनी १ जुलैला गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या भेट घेतली होती. त्यानंतर लगेच महाधिवक्ता तुषार मेहता यांनाही भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तुषार मेहता यांनी या भेटीचा इन्कार केला असून तसेच सुवेंदु अधिकारी यांचे येणे अनियोजित होते, असा खुलासाही केला आहे.
Politics in west Bengal erupts
महत्त्वाच्या बातम्या