Fake Prashant Kishor : प्रशांत किशोर अर्थात पीके हे नाव राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाचे आहे. पक्षांची निवडणुकीतील रणनीती ठरवण्यापासून ते निवडणुकीतील विजयापर्यंत त्यांनी आजपर्यंत लक्षणीय काम केले आहे. परंतु त्यांच्या या नावलौकिकाचा फायदा घेत एका बनावट पीकेने धुमाकूळ घातला आहे. प्रशांत किशोर यांच्या आवाज फोन करून या भामट्याने आजवर अनेक राजकारण्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कोण आहे हा बनावट पीके, कशी आहे याची कार्यपद्धती? वाचा सविस्तर… Police Busted Fake Prashant Kishor Who deal With Politicians To Get Them Ticket Read Detailed Story
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रशांत किशोर अर्थात पीके हे नाव राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाचे आहे. पक्षांची निवडणुकीतील रणनीती ठरवण्यापासून ते निवडणुकीतील विजयापर्यंत त्यांनी आजपर्यंत लक्षणीय काम केले आहे. परंतु त्यांच्या या नावलौकिकाचा फायदा घेत एका बनावट पीकेने धुमाकूळ घातला आहे. प्रशांत किशोर यांच्या आवाज फोन करून या भामट्याने आजवर अनेक राजकारण्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
कोण आहे बनावट पीके?
गौरव शर्मा हा राजकारण्यांना प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा आवाज काढून संपर्क साधायचा. यानंतर त्यांना तिकीट देण्याचे आमिष देऊन पैसे उकळायचा. त्याच्या या जाळ्यात आजपर्यंत अनेक जण अडकले आहेत. तथापि, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याची चौकशी चालवली आहे. प्राथमिक चौकशीत या गौरव शर्मा म्हणजेच बनावट पीकेने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
बनावट पीके राजकारण्यांची कशी करायचा लूट?
आरोपी गौरव शर्मा निवडणुकांच्या काळात तिकिटांसाठी इच्छुक उमेदवारांचा शोध घ्यायचा. त्यांना संपर्क करण्यापूर्वी त्या उमेदवाराची संपूर्ण कुंडली गोळा करायचा. सध्या ओरिजनल प्रशांत किशोर आणि त्यांची टीम पंजाबात काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी रणनीती ठरवण्याच काम करत आहे. हा भामटा तेथेही पोहोचला. याने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याशीही तिकीट मिळवून देण्याबाबत बोलणी केली होती. पोलीस आता गायकाशी याबाबत संपर्क साधारण आहेत.
आरोपी गौरव शर्मा हा अमृतसरचा रहिवासी आहे. तो व्यावसायिक सूत्रसंचालकाचे काम करतो. ‘दै. भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्याविरुद्ध 3 डिसेंबर 2018 रोजी जयपुरात एक गुन्हा दाखल झाला होता. त्याच पोलीस ठाण्यात 8 जुलै 2019 रोजी राजस्थानचे माजी काँग्रेस आमदार रामचंद्र सराधना यांच्याकडूनही केस दाखल करण्यात आली.
भल्या-भल्या राजकारण्यांना कोट्यवधींचा गंडा
आरोपी गौरव शर्मा याने प्रशांत किशोर यांच्या आवाजात फोन करून तिकीट देण्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता. त्याने ही रक्कम 80 लाख आणि 1.2 कोटी अशी दोनदा करून घेतली. पहिल्या केसमध्ये गौरव शर्माला 56 दिवस तुरुंगात राहावे लागले. पण दुसऱ्या खटल्यात त्याला जामीन मिळाला. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. यानंतर त्याने पंजाबातील 13 आणि राजस्थानातील 2 जणांना गंडा घातला. काही दिवसांपूर्वीच त्याने मानसा येथील काँग्रेस नेत्याचीही फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी लुधियानात केसही दाखल आहे. यानंतर पोलिसांनी शिताफीने गौरव शर्मा ऊर्फ गोरा ऊर्फ बनावट पीकेला अटक केली आहे.
आता इतरही राजकारणी नोंदवू लागले तक्रार
पोलिसांच्या मते, प्रशांत किशोर यांच्या आवाजात बोलून लोकांना गंडवणारा गौरव शर्मा हा एवढा चलाख आहे की तो ज्याला फसवायचे आहे त्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा, कौटुंबिक पार्श्वभूमी, राजकीय आणि सामाजिक संबंधांची पूर्ण माहिती गोळा करायचा. यानंतर तो लोकांना संपर्क करून त्यांचा हितचिंतक असल्याचे भासवायचा, त्यांना राजकारणात स्टार बनवण्याचे आमिष दाखवायचा.
पोलिसांच्या चौकशीत त्याने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्याची पंजाबी गायक सिद्धू मुसेवालशीही डील झाली होती. ही डील तब्बल पाच कोटी रुपयांत झाल्याचे सांगितले जाते. त्याची फंडिंगही बाहेरून होणार होती. जर असे झाले तर याप्रकरणी मनी लाँड्रिंग केल्याने इतरांची नावे समोर येतील. सध्या पोलीस आरोपी गौरव शर्माची चौकशी करून या कामात त्याला मदत करणाऱ्या इतर साथीदारांचीही माहिती घेत आहेत. त्याच्या अटकेनंतर आणखी तीन नेत्यांनी पोलिसांत येऊन त्याच्या टोळीबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यापैकी एक लुधियाना, दुसरा चंदिगड आणि तिसरा दिल्लीतील आहे. या सर्वांचीही या टोळीने कोट्यवधींची फसवणूक केली आहे. आता पोलिसांनी या आरोपीने गंडा घातलेल्या इतर राज्यांतील नेत्यांनाही समोर येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्याला कठोर शिक्षा होऊ शकेल.
Police Busted Fake Prashant Kishor Who deal With Politicians To Get Them Ticket Read Detailed Story
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : विध्वंसकारी तौकते चक्रीवादळानंतर गिर अभयारण्यात सिंहांचा पुन्हा मुक्त संचार
- Corona Deaths : कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूचा रेकॉर्ड भारताच्या नव्हे, तर अमेरिकेच्याच नावावर, वाचा सविस्तर..
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गडकरी महाराष्ट्राचे नेते, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच!
- National seminar : राष्ट्रीय बाल आयोग व आनंदी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात मिळाली लहान मुलांना दत्तक घेताना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे
- वादग्रस्त ट्वीटनंतर शरजील उस्मानीविरुद्ध अंबडमध्ये गुन्हा दाखल, प्रभू रामचंद्राचा जयघोष करणाऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना भोवली