• Download App
    पंजाबमधील मोदींच्या रॅलीचे पडसाद उमटले महाराष्ट्रात , मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपचा मोर्चा PM SECURITY: Modi's rally in Punjab has repercussions , BJP march on Congress office in Mumbai

    PM SECURITY : पंजाबमधील मोदींच्या रॅलीचे पडसाद उमटले महाराष्ट्रात , मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपचा मोर्चा

    भाजपच्या या युवा मोर्चामध्ये मुलींचा देखील समावेश होता.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.PM SECURITY: Modi’s rally in Punjab has repercussions , BJP march on Congress office in Mumbai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (५ जानेवारी २०२२) पंजाबमधील फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करणार होते, परंतु मोदी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली त्यामुळे रॅली रद्द करण्यात आली.गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्यासाठी गेले होते.परंतु संतप्त शेतकऱ्यांनी मोदींचा ताफा रोखला आणि १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला होता.

    तसेच पंजाबमध्ये घडलेल्या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत.दरम्यान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीचा निषेध करण्यासाठी आज भाजपचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या दादरमधील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले होते.भाजपच्या या युवा मोर्चामध्ये मुलींचा देखील समावेश होता.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.तसेच पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.



    दरम्यान यावेळी भाजपच्या युवा मोर्चातील कार्यकर्त्याने सांगितले की , काँग्रेस ज्याप्रकारे पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वागले, ही लोकशाहीची हत्या आहे. यामधूनच काँग्रेसचा खरा चेहरा दिसून आला. काँग्रेस सर्वात मोठा गद्दार पक्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्ही काँग्रेसमुक्त भारत होणार नाही, तोपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाला सोडणार नाही.

    PM SECURITY: Modi’s rally in Punjab has repercussions , BJP march on Congress office in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य