वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची (UNSC )बैठक होणार आहे. UNSC चं अध्यक्षपद भूषवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. pm narendra modi to be first indian prime minister to preside over unsc meeting
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक ७५ वर्षांत प्रथमच भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होत आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली. भारत आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे असेल. या कालावधीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा होईल, अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली. ‘७५ वर्षांत प्रथमच भारतीय नेतृत्त्वानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यात रस दाखवला,’ असं अकबरुद्दीन म्हणाले.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत १५ देश आहेत. यापैकी ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य आहेत. स्थायी देशांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. भारत परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. अस्थायी सदस्य म्हणून भारताला २ वर्षांचा कालावधी मिळाला आहे. १ जानेवारी २०२१ पासून या कालालधीची सुरुवात झाली आहे.
pm narendra modi to be first indian prime minister to preside over unsc meeting
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार