• Download App
    PM Modi : दिव्यांग चित्रकार आयुष कुंडल याला भेटून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेरित!!| PM Modi: Prime Minister Narendra Modi himself inspired by meeting Divyang painter Ayush Kundal

    PM Modi : दिव्यांग चित्रकार आयुष कुंडल याला भेटून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेरित!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणापलिकडे अनेक तरुणांचे आयकॉन आहेत. अनेक तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे… पण ते स्वतः कोणाकडून प्रेरित होतात, हे त्यांनी आज स्वतः सांगितले आहे.PM Modi: Prime Minister Narendra Modi himself inspired by meeting Divyang painter Ayush Kundal

    मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडवाह गावातील दिव्यांग चित्रकार आयुष कुंडल यांची भेट घेऊन मी धन्य झालो. आयुष सारख्या व्यक्तीला भेटून मला प्रेरणा मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आयुष कुंडल हा दिव्यांग चित्रकार आहे. पायातील बोटांमध्ये ब्रश धरून तो आपल्या कुंचल्याची किमया कॅनव्हास वर साकार करतो.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आयुष कुंडल याने भेटू घेऊन स्वामी विवेकानंद यांचे चित्र त्यांना भेट दिले. या चित्रासह आयुष कुंडल याच्याबरोबर फोटो काढून घेऊन मोदींनी तो आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला आहे. आयुष कुंडल याच्यासारख्या दिव्यांग किमयागाराला भेटून मी प्रेरित झालो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर आयुषला मी ट्विटरवर फॉलो करतो, असेही पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यापूर्वी आयुष कुंडल एकदा मिलेनियम सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना देखील भेटला आहे. बच्चन यांना देखील त्याने आपण काढलेले एक उत्तम चित्र भेट दिले आहे.

    PM Modi: Prime Minister Narendra Modi himself inspired by meeting Divyang painter Ayush Kundal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये