• Download App
    पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच : हेल्थ कार्ड काय आहे? ते कसे तयार होणार?, त्याचा फायदा काय? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर... । PM Modi Launch Ayushman Bharat Digital Health Mission, Know What Is Health Card and Its Importance Read in Details

    पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच : काय आहे हेल्थ कार्ड? ते कसे तयार होणार?, त्याचा फायदा काय? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल आरोग्य अभियान (PM-DHM) चा शुभारंभ केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू करण्यात आली. या प्रमुख योजनेचा उद्देश देशभरातील आरोग्यसेवा डिजिटल करणे आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक युनिक हेल्थ आयडी तयार केला जाईल, जेणेकरून देशव्यापी डिजिटल हेल्थ इको-सिस्टिम तयार करता येईल. PM Modi Launch Ayushman Bharat Digital Health Mission, Know About What Is Health Card and Its Importance Read in Details


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल आरोग्य अभियान (PM-DHM) चा शुभारंभ केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू करण्यात आली. या प्रमुख योजनेचा उद्देश देशभरातील आरोग्यसेवा डिजिटल करणे आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक युनिक हेल्थ आयडी तयार केला जाईल, जेणेकरून देशव्यापी डिजिटल हेल्थ इको-सिस्टिम तयार करता येईल.

    पूर्वी हे अभियान नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (NDHM) नावाने सुरू होते. पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्ट 2020 रोजी अंदमान-निकोबार, चंदिगड, दादरा नगर हवेली, दमण दिव, लडाख आणि लक्षद्वीप येथे हे अभियान सुरू केले. आजपासून ते देशभरात सुरू झाले आहे.

    रेशन ते प्रशासन सबकुछ डिजिटल

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशातील सामान्य नागरिकांची शक्ती वाढली आहे. आपल्या देशात 130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाइल वापरकर्ते, 80 कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि 43 कोटी जन-धन बँक खाती आहेत, जी जगात कुठेही नाही. आज रेशनपासून प्रशासनापर्यंत सर्व काही डिजिटल झाले आहे.

    ते म्हणाले की, आरोग्य सेतू अॅपने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत केली, तसेच देशातील प्रत्येकाला मोफत लस दिली जात आहे. आतापर्यंत 90 कोटी लसी देण्यात आल्या आहेत आणि यामध्ये कोविन अॅपची मोठी भूमिका आहे.

    2 कोटी लोकांनी आयुष्मान योजनेचा लाभ घेतला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आतापर्यंत देशातील दोन कोटी लोकांना आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचार मिळाले आहेत. ते म्हणाले की, पूर्वी अनेक गरीब लोक होते जे रुग्णालयात जाणे टाळत असत, परंतु आयुष्मान भारत योजनेमुळे त्यांची भीती दूर झाली आहे.

    कसे आणि कुठे तयार कराल हेल्थ कार्ड?

    • गुगल प्ले स्टोअरवर NDHM हेल्थ रिकॉर्ड उपलब्ध होईल.
    • PHR अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
    • यासाठी 14 डिजिटची युनिक आयडी असेल.
    • सरकारी किंवा खासगी रुग्णालये, कम्युनिटी हेल्थ सेंटरवर कार्ड तयार करता येईल.
    • प्राथमिक आरोग्य केंद्र, वेलनेस सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथेही ही सुविधा उपलब्ध होईल.

    या हेल्थ कार्डचे फायदे काय?

    • तुमची आरोग्यासंबंधित सर्व माहिती डिजिटल फॉरमॅटमध्ये नोंद होईल.
    • तुमची पूर्ण मेडिकल हिस्ट्री डिजिटल फॉरमॅटमध्ये अपडेट राहील.
    • तुम्ही एखाद्या दुसऱ्या शहरात, रुग्णालयातही यूनिक आयडीमुळे डॉक्यूमेंट्स पाहू शकाल.
    • यामुळे कोणत्याही डॉक्टरांना तुमच्यावर उपचार करणे सहज होऊन जाईल.

    या कार्डमध्ये नोंदी कशा होणार?

    • कार्ड तयार केल्यानंतर सर्व रिपोर्ट्स स्कॅन करून अपलोड कराव्या लागतील.
    • पुढेही सर्व रिपोर्ट्स आपोआप अपलोड होत राहतील.
    • युनिक नंबरच्या माध्यमातून रिपोर्ट्स कार्डशी लिंक होतील.
    • रुग्णालयात NDHM कर्मचारी या कामात तुमची मदत करण्यासाठी उपलब्ध असतील.

    हेल्थ कार्डमध्ये कोणकोणत्या नोंदी होणार?

    मेडिकल रेकॉर्डशी संबंधित सर्व माहितीची नोंद होणार.
    एवढेच नाही, गतवेळी एखाद्या औषधाचा तुमच्यावर काय परिणाम झाला होता, ही सुद्धा माहिती असेल.
    औषध बदलले तर का बदलले गेले, या सर्व गोष्टी डॉक्टरांना तुमचा आजार, केस समजून घेण्यात मदत करतील.

    दुसऱ्या शहरात डेटा कसा मिळेल?

    तुमचा हेल्थ डेटा हॉस्पिटलमध्ये नाही, तर डेटा सेंटरमध्ये असेल, जो कार्डद्वारे पाहता येऊ शकेल. फक्त हे लक्षात घ्या की, जर तुम्ही उपचारासाठी बाहेर कुठेही गेलात तर हे हेल्थ कार्ड तुमच्यासाठी आधार कार्डाइतकेच महत्त्वाचे असेल. डेटा ट्रान्सफर होऊ शकतो, परंतु तुम्ही संमती दिली तरच हे होऊ शकेल. जेव्हा कोणी तुमचा डेटा ट्रान्सफर किंवा पाहू इच्छित असेल, तेव्हा तुम्हाला OTP विचारण्यात येईल. तुम्ही ओटीपी दिला नाही तर डेटा दिसणार नाही.

    हेल्थ कार्ड असणे बंधनकारक आहे का?

    हेल्थ कार्ड असणे बंधनकारक राहणार नाही. तुम्हाला कार्ड बनवायचे आहे की नाही, हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. पण हेल्थ कार्ड तयार केल्याचे फायदेच फायदे आहेत, तुमचा सर्व आरोग्याचा इतिहास यात डिजिटली साठवला जाईल.

    हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी काय-काय लागेल?

    हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक असेल. याशिवाय, नाव, जन्म वर्ष, लिंग, पत्ता यासारखी सामान्य माहिती भरावी लागेल. आपल्याला कोणतेही दस्तऐवज ऑफलाइन सबमिट करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. त्याच प्रक्रियेद्वारे मुलांसाठीही ओळखपत्रे बनवली जातील.

    PM Modi Launch Ayushman Bharat Digital Health Mission, Know What Is Health Card and Its Importance Read in Details

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य