- दानिश सिद्दीकी म्हणजे एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जात. Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink ‘Journalist of the Year’ award; Wife Frederick Siddiqui accepts the award
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रॉयटर्ससाठी अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करायला गेलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची 16 जुलैला तालिबान या दहशतवादी गटाकडून हत्या करण्यात आली होती.दरम्यान फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मुंबई प्रेस क्लबच्या वतीनं प्रतिष्ठेचा मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या हस्ते या वर्षीचा रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ दानिश सिद्दीकी यांच्या पत्नी फेड्रिक सिद्दीकी यांनी स्वीकारला आहे.दरम्यान हा पुरस्कार प्रदान करताना सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, “दानिश सिद्दीकी म्हणजे एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जात. जर एखादी घटना एक हजार शब्दात सांगायची असेल तर त्यासाठी दानिश सिद्दीकी यांचा एक फोटो माहितीसाठी खूप असायचा.”
Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink ‘Journalist of the Year’ award; Wife Frederick Siddiqui accepts the award
महत्त्वाच्या बातम्या
- आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा – मोदी यांचे आवाहन
- महाराष्ट्रात पुन्हा वाढू लागला कोरोनाचा संसर्ग, पुढील दोन-तीन आठवडे महत्त्वाचे
- खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी
- झाशीच्या राणीचा गौरव, झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन नामकरण