पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 5 महिने इंधनाच्या दरात वाढ न केल्याने मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत असतानाही इंधनाच्या किमती न वाढल्यामुळे नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत देशातील टॉप-3 पेट्रोलियम कंपन्यांना 2.25 बिलियन डॉलर (सुमारे 19,000 कोटी रुपये) तोटा सहन करावा लागला आहे.Petroleum companies lose Rs 19,000 crore due to non-increase in fuel prices for 5 months, Moody’s reports
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 5 महिने इंधनाच्या दरात वाढ न केल्याने मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत असतानाही इंधनाच्या किमती न वाढल्यामुळे नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत देशातील टॉप-3 पेट्रोलियम कंपन्यांना 2.25 बिलियन डॉलर (सुमारे 19,000 कोटी रुपये) तोटा सहन करावा लागला आहे.
तिन्ही कंपन्यांचे नुकसान
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) यांना इंधनाच्या किमती न वाढवल्यामुळे हा तोटा झाला आहे, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने गुरुवारी एका अहवालात म्हटले आहे.
- मोठी बातमी : १ एप्रिल २०२३ पासून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळणार, पेट्रोलियम सचिवांचे प्रतिपादन
कच्चे तेल 82 डॉलरवरून थेट 111 डॉलवर पोहोचले
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही 4 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 दरम्यान देशात इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या वेळी, कच्च्या तेलाची किंमत नोव्हेंबरमध्ये प्रति बॅरल 82 डॉलरवरून मार्चच्या पहिल्या तीन आठवड्यात सरासरी 111 डॉलर प्रति बॅरल गेली.
22 आणि 23 मार्च रोजी दरवाढ
पेट्रोलियम तेल कंपन्यांनी 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 – 80 पैशांनी वाढ केली आहे. गुरुवारी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
मूडीजने प्रसिद्ध केला अहवाल
मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “सध्याच्या बाजारभावांच्या आधारे, पेट्रोलियम विपणन कंपन्यांना सध्या पेट्रोलच्या विक्रीवर प्रति बॅरल सुमारे $25 (रु. 1,900 पेक्षा जास्त) आणि डिझेलवर प्रति बॅरल $24 इतका तोटा सहन करावा लागत आहे. अहवालात म्हटले आहे की, जर क्रूड तेलाच्या किमती सरासरी 111 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहिल्या, आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांना एकत्रितपणे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर दररोज 65 ते 70 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.
2.25 अब्ज डॉलर्सचे नुकसान
मूडीजने म्हटले आहे की, “नोव्हेंबर ते मार्च या पहिल्या तीन आठवड्यांदरम्यान विक्रीच्या सरासरीच्या आमच्या अंदाजानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम रिफायनिंग आणि मार्केटिंग कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून अंदाजे 2.25 अब्ज डॉलरचा महसुली तोटा झाला आहे.”
Petroleum companies lose Rs 19,000 crore due to non-increase in fuel prices for 5 months, Moody’s reports
महत्त्वाच्या बातम्या
- नाशकात भगवी शॉल घालून ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी गेलेल्या महिलांना रोखलं, थिएटरबाहेरच काढायला लावली गळ्यातील शॉल, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
- कोरोनामुळे मृत्यूंचा घोटाळा : नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, महाराष्ट्रासह 3 राज्यांतून पडताळणी
- Uniform Civil Code : पहिल्या कॅबिनेट बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा, समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय, निवडणुकीत दिले होते आश्वासन
- Kashmiri Hindu Genocide : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा फेरतपास करा; यासिन मलिक, बिट्टा कराटेवर खटले चालवा; सुप्रीम कोर्टात फेरयाचिका!!