आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत असून लवकरच भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी खाली येऊ शकतात. देशातील सरकारी मालकीची तेल कंपनी IOCL ने पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. petrol diesel price today not chnaged on 15 november 2021 check here 1 liter petrol price
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत असून लवकरच भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी खाली येऊ शकतात. देशातील सरकारी मालकीची तेल कंपनी IOCL ने पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत.
कच्च्या तेलात घसरण
आज WTI क्रूड 80.37 च्या पातळीवर 0.52 टक्क्यांनी घसरत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.61 टक्क्यांनी घसरून 81.67 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत
- दिल्लीत पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 109.98 रुपये, तर डिझेलचा दर 94.14 रुपयांवर पोहोचला आहे.
- कोलकात्यात पेट्रोलचा दर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
- याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 101.40 रुपये आणि डिझेलचा दर 91.42 रुपये प्रति लिटर आहे.
भारतीय बाजारातही घसरण होऊ शकते
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळत आहे, त्यामुळे भारतात लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल $85 वरून $81 प्रति बॅरलच्या खाली घसरल्या आहेत. परदेशी बाजारातील अशीच घसरण कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेतही पेट्रोल स्वस्त होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात नवीन दर
IOCL दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती कंपनीच्या वेबसाइट आणि एसएमएसद्वारे तपासू शकता.
एसएमएसद्वारे असे तपासा दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल, त्यानंतर त्या दिवसाचे नवीन दर तुमच्यापर्यंत संदेशाच्या स्वरूपात येतील. हा संदेश पाठवण्यासाठी तुम्हाला RSP<space> पेट्रोल पंप डीलर कोड ९२२४९ ९२२४९ वर पाठवावा लागेल.
petrol diesel price today not chnaged on 15 november 2021 check here 1 liter petrol price
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी