• Download App
    जगातील कोणतीही कोरोनाविरोधी लस भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा।Pave the way for any anti-corona vaccine to be available in India

    जगातील कोणतीही कोरोनाविरोधी लस भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीयांना जगातील कोणतीही कोरोना विरोधी लस मिळावी, यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात प्रभावी ठरलेली प्रत्येक लस भारतात मिळणार आहे. Pave the way for any anti-corona vaccine to be available in India

    विदेशात ज्या लसींना आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे, त्या सर्व लसींचा वापर करण्यासाठी केंद्र सरकार तातडीने मंजुरी देणार आहे. लस तुटवडय़ाचे संकट दूर करण्यासाठी केंद्राने हा मोठा निर्णय घेतला. यामुळे लसीकरणाला अधिक चालन मिळणार आहे.



    तुटवड्यामुळे लसीकरण मंदावले

    भारताने कोरोना लसींची निर्यात केली. मात्र लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण मंदावले आहे. त्याला गती देण्यासाठी ‘नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19’ या तज्ञांच्या ग्रुपने काही उपाय सुचवले होते. वेगवेगळ्या देशांनी ज्या लसींना आपत्कालीन मंजुरी दिली आहे त्या आयात कराव्यात, असा प्रस्ताव तज्ञांनी मांडला होता. तो मान्य केला.

    जगभरात 270 लसींची निर्मिती

    जगभरात 270 लसींची निर्मिती सुरू आहे. यातील 13 लसींनाआपत्कालीन मंजुरी दिली आहे. फायजर, मॉडर्नाबरोबर जॉन्सन ऍण्ड जॉन्सनची लस भारतात उपलब्ध होणार आहे.

    100 कोरोनाग्रस्तांवर सात दिवस चाचणी

    विदेशातील लसींची सात दिवस 100 कोरोनाग्रस्तांवर चाचणी केली जाईल. काही साइड इफेक्ट झाला का पाहिले जाईल. त्यानंतरच लसीकरण मोहिमेत विदेशी लस वापरली जाईल, असे केंद्राने म्हटले आहे.

    Pave the way for any anti-corona vaccine to be available in India

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य