• Download App
    पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूमध्ये आधुनिक ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठाPakistans new mov supply of arms through modern drones in Jammu

    पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूमध्ये आधुनिक ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा

    पाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेले पॅकेट सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असता त्यामध्ये शस्त्र आढळून आली आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर : जम्मूमध्ये शस्त्र आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी पाकिस्तान आता अत्याधुनिक ड्रोनचा वापर करत आहे. यासोबतच सुरक्षा दलांच्या नजरा चुकवण्यासाठी पाकिस्तान आता खूप उंचीवरून ड्रोन उडवत आहे. मात्र वेळोवेळी सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या या कुरपती फोल ठरवल्या आहेत. Pakistans new mov supply of arms through modern drones in Jammu

    सांबा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, नुकतेच जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील विजयपूर भागात पाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेले पॅकेट सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. या जप्त केलेल्या पाकिटातून सुरक्षा दलांनी तीन चिनी पिस्तूल, 6 मॅगझिन, 48 जिवंत काडतुसे आणि 4 हातबॉम्ब जप्त केले आहेत.

    या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांना पॅकेटजवळ अनेक मीटर लांब दोरी सापडली असून त्यावरून असे दिसून आले की, हे ड्रोन 70 ते 80 फूट उंचीवर उड्डाण करत असावेत, जेणेकरून ते सर्वसामान्य नागरिक आणि सुरक्षा दलांना दिसू नये.

    प्राप्त माहितीनुसार पाकिस्तान आता भारताला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पाठवण्यासाठी हाय एल्टीट्यूड फ्लाइंग ड्रोनचा वापर करत आहे. यासोबतच पाकिस्तान आता अशा ड्रोनचाही वापर करत आहे, ज्यामध्ये केवळ आवाजच कमी नाही तर उडताना चमकणारे दिवेही नगण्य आहेत.

    Pakistans new mov supply of arms through modern drones in Jammu

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य