• Download App
    पाकिस्तानच्या मदतीमुळेच तालिबानचा संपूर्ण अफगणिस्तानवर ताबा । Pakistan helped Taliban for reviving in Afghanistan

    पाकिस्तानच्या मदतीमुळेच तालिबानचा संपूर्ण अफगणिस्तानवर ताबा

    वृत्तसंस्था

    काबूल : तालिबानने पंजशीरचे युद्ध जिंकून अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. तालिबानने या कामी पाकिस्तानची मदत घेतली आहे. रेझिस्टन्स फोर्सचे नेतृत्व करणाऱ्या अहमद मसूद यांनी देखील पाकिस्तानच्या हवाई दलाकडून सातत्याने बॉम्बवर्षाव केला जात असल्याचे सांगितले. यामुळे तालिबानला पंजशीर जिंकणे सोपे झाले. आता आमची खरी लढाई पाकिस्तानशी आहे. कारण पाकिस्तान सैनिक आणि आयएसआयने या संघर्षात तालिबानकडून नेतृत्व केले आहे, असे मसूद म्हणाला. Pakistan helped Taliban for reviving in Afghanistan



    पंजशीरपूर्वीही पाकिस्तानने तालिबानला अनेकदा मदत केली आहे. अनेक अमेरिकी सैनिक अधिकाऱ्यांनी देखील तालिबानच्या मागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा सामील असल्याचा दावा केला. अर्थात पाकिस्तानने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र पाकिस्तान आता तालिबानच्या रुपाने पुन्हा अफगणिस्तानच्या राजकारणात केंद्रस्थानी येवू पहात आहे. गेली वीस वर्षे अमेरिकेपुढे पाकिस्तानला नमते घ्यावे लागत होते. पण आता मात्र अमेरिकेनेच माघार घेतल्याने पाकिस्तानचे फावले आहे. गेल्या काही वर्षात अनेक तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने आसरा दिला होता. ते तालिबानी आता मायदेशी परतू लागले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना केलेल्या मदतीची ते परतफेड नक्कीच करतील यात शंका नाही असे मानले जाते.

    Pakistan helped Taliban for reviving in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lok Sabha : ऑनलाइन गेमिंगवर बंदीसह लोकसभेत 4 विधेयके सादर, विरोधी पक्षाच्या खासदारांचा चर्चेस नकार

    Karnataka : कर्नाटकात SC आरक्षणात उप-कोटा लागू होणार; राज्य सरकार विधानसभेत मांडू शकते विधेयक

    Elon Musk : मस्क यांच्या स्टारलिंकची UIDAIशी भागीदारी; सॅटेलाइट इंटरनेटसाठी सहजपणे ग्राहक जोडू शकणार