• Download App
    पाकिस्तान झाला कंगाल, भूकबळीचे संकट, इम्रान खान यांनीच केले मान्य|Pakistan became poor, starvation crisis, Imran Khan agreed

    पाकिस्तान झाला कंगाल, भूकबळीचे संकट, इम्रान खान यांनीच केले मान्य

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पाकिस्तानवर भूकबळीचे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तान पूर्णपणे कंगाल झाला असून अन्नसुरक्षा हे पाकिस्तानसमोरचे सर्वात मोठे संकट असल्याचे खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केले आहे.Pakistan became poor, starvation crisis, Imran Khan agreed

    डॉनच्या वृत्तानुसार, इस्लामाबाद येथील शेतकरी परिषदेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, गेल्या वर्षी पाकिस्तानने 40 दशलक्ष टन गहू आयात केला. याचा परकीय चलन साठ्यावर वाईट परिणाम झाला होता,



    ज्याची आधीपासूनच कमतरता होती. पाकिस्तानसमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे. वेगाने वाढणाºयालोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे.
    पौष्टिक अन्नाअभावी 40 टक्के मुलांचा शारिरीक तसंच बुद्धीचाही विकास होत नाही. अन्न सुरक्षा ही वास्तविकता राष्ट्रीय सुरक्षा आहे.

    मुलांच्या विकासात शुद्ध दुधाची उपलब्धता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर देश सध्या आहे त्याच अवस्थेत राहिला तर अन्न सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनेल. जर एखादा देश आपल्या लोकांना चांगला आहार देऊ शकत नसेल तर तो कधीच प्रगती करू शकत नाही.

    जर 15-40 टक्के लोक भुकेले असतील तर याचा देशाच्या विकासावर मोठा परिणाम होईल. जो देश आपल्या लोकांना पुरेसा आहार देऊ शकत नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

    Pakistan became poor, starvation crisis, Imran Khan agreed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!