वृत्तसंस्था
हैदराबाद : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे पितामह होते, असे गौरवोद्गार भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी आज काढले. हैदराबाद आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राच्या रजिस्ट्रेशन कार्यक्रमात ते बोलत होते.P. V. Narasimha Rao father of Indian economic reforms, says Chief Justice of India N. V. Ramana
आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र हे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीची वाद प्रकरणे सोडवते. भारतीय न्याय न्यायपालिकेच्या बाहेर लवकरात लवकर वाद सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याचे हैदराबाद केंद्राचे रजिस्ट्रेशन आज झाले. या कार्यक्रमात सर न्यायाधीश रामन्ना बोलत होते.
ते म्हणाले, की भारताला मध्यस्थी बाहेरून आयात करण्याची गरज नाही. भारतीय तत्वज्ञानातच चर्चा, वाद-विवाद, मध्यस्थी यातून मोठे वाद सोडविण्याची परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय लवाद अणि मध्यस्थी कायदा 1996 च्या अनुसार हैदराबादचे आंतरराष्ट्रीय लवाद – मध्यस्थी केंद्र काम करेल. 1991 मध्ये त्यावेळचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक सुधारणा धोरणाची सुरुवात केली.
त्यातूनच आंतरराष्ट्रीय लवादाची स्थापना झाली, याकडे सरन्यायाधीश रामण्णा यांनी लक्ष वेधले. नरसिंहराव हे तेलंगणा बिड्डा होते. म्हणजे तेलंगणाचे सुपुत्र होते. त्यांच्या आर्थिक सुधारणा धोरणामुळे भारताने जागतिक अर्थकारणात मोठी झेप घेतली आणि महत्वाचे स्थान मिळवले, असे त्यांनी सांगितले.
बहुराष्ट्रीय कंपन्यांना या आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्रमधून आपापले वाद-विवाद सोडवून घेण्यासाठी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सरन्यायाधीश रामण्णा यांनी केले. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ति नागेश्वर राव आणि निवृत्त न्यायमूर्ति रवींद्रन हे हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे तहहयात विश्वस्त असतील.
P. V. Narasimha Rao father of Indian economic reforms, says Chief Justice of India N. V. Ramana
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे म्हणाले सत्ता समोर दिसत नसल्याने एकत्र आलोय पण..
- राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो पक्ष लोकांनी डोक्यावर घेतला…!!”
- सराफ व्यापाऱ्यांचा २३ ऑगस्टला बंद हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबरमुळे अडचण
- कलाकारांना किमान खड्डे बुजविण्याची तरी काम द्या; ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा राज्य सरकारवर निशाणा