• Download App
    ओवैसींचा पक्ष एआयएमआयएमचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने लावला एलन मस्कचा फोटो । Owaisi party AIMIM Twitter account hacked, Elon Musk photo used for profile

    ओवैसींचा पक्ष AIMIM चे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने लावला एलन मस्कचा फोटो !

     AIMIM Twitter account hacked : असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे ट्विटर अकाउंट रविवारी हॅक झाले. हॅकर्सनी पक्षाच्या नावाऐवजी एलन मस्कचे नाव लिहिले. एवढेच नाही, तर ट्विटर डीपीवरही एलन मस्क यांचा फोटो ठेवण्यात आला. एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत. त्यांच्याकडे स्पेस एक्स आणि टेस्ला यासारख्या जागतिक कंपन्या आहेत. Owaisi party AIMIM Twitter account hacked, Elon Musk photo used for profile


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे ट्विटर अकाउंट रविवारी हॅक झाले. हॅकर्सनी पक्षाच्या नावाऐवजी एलन मस्कचे नाव लिहिले. एवढेच नाही, तर ट्विटर डीपीवरही एलन मस्क यांचा फोटो ठेवण्यात आला. एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत. त्यांच्याकडे स्पेस एक्स आणि टेस्ला यासारख्या जागतिक कंपन्या आहेत.

    AIMIM यूपी प्रमुखाच्या ट्विटर अकाउंटवरही बंदी

    दरम्यान, रविवारी ट्विटरने एआयएमआयएमच्या उत्तर प्रदेश प्रमुखाच्या ट्विटर खात्यावरही बंदी घातली. या खात्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. नंतर हे खाते पुन्हा सक्रिय झाले.

    एमआयएम यूपीमधील 100 जागा लढवणार

    ओवैसी यांनी नुकताच जाहीर केले होते की, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशात सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या सहकार्याने भागीदारी संकल्प मोर्चाची स्थापना केली आहे. यामध्ये इतर छोट्या पक्षांनी सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा आहे. मात्र ओवैसी यांच्या घोषणेनंतर ते विरोधी पक्षांच्या निशाण्यावरही आहेत.

    ओवैसींचे चॅलेंज योगींनी स्वीकारले

    अलीकडेच असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, कोणत्याही परिस्थितीत 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. ओवैसी यांच्या आव्हानाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते, ‘ओवैसी हे एक मोठे नेते आहेत, ते देशभरात प्रचार करतात. त्यांना एका विशिष्ट समुदायाचा पाठिंबा आहे, परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाहीत. भाजप आपले मुद्दे, मूल्ये घेऊन निवडणूक रिंगणात राहील. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारतो.”

    Owaisi party AIMIM Twitter account hacked, Elon Musk photo used for profile

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य