• Download App
    आमचे कायदा मंत्री एक उत्तम डान्सर, पंतप्रधानांनी केले किरेन रिजिजू यांचे कौतुक|Our Law Minister is a great dancer, the Prime Minister praised Kiren Rijiju

    आमचे कायदा मंत्री एक उत्तम डान्सर, पंतप्रधानांनी केले किरेन रिजिजू यांचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचे कायदामंत्री किरेन रिजिजू डान्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला टॅग करत आमचे कायदामंत्री हे एक उत्तम डान्सर असल्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अरुणाचल प्रदेशची जिवंत आणि गौरवशाली परंपरा पाहून आनंद वाटल्याचेही त्यांनी म्हटले आहे.Our Law Minister is a great dancer, the Prime Minister praised Kiren Rijiju

    अरुणाचल प्रदेशातील काजलंग गावात मिजी जमातीच्या नागरिकांनी किरेन रिजिजू यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी पारंपरिक नृत्यही सादर केले. नृत्याने आपला पाहुणचार होत असल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रिजिजू यांनीदेखील संगीतावर ताल धरत आपलं नृत्यकौशल्य दाखवून दिलं. या गावातील काही प्रकल्पांना भेट देत असता ग्रामस्थांनी केलेल्या आदरातिथ्यानं आपण भारावून गेल्याचं रिजिजू म्हणाले.



    पांढरा शर्ट, ट्राऊझर, शूज आणि जॅकेट या पेहरावात नृत्य करणाºया कायदामंत्री रिजिजू यांच्या या व्हिडिओचं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं आहे. आपले कायदामंत्री एक उत्तम डान्सर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रिजिजू यांनी ट्विट केलेला एक मिनिटाचा व्हिडिओ रिट्विट करत त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या गौरवशाली संस्कृतीचं कौतुक केलं आहे.

    किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार असून फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखले जातात. हेल्थ आणि फिटनेससंदभार्तील वेगवेगळे व्हिडिओज ते शेअर करत असतात. ते एक उत्तम गायकदेखील आहेत. अनेकदा आपल्या गाण्याचे व्हिडिओजही ते शेअर करतात.

    Our Law Minister is a great dancer, the Prime Minister praised Kiren Rijiju

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!