विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोनिया गांधींनी पुढाकार घेऊन बंगलोर मध्ये घेतलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला 26 पक्षांचे नेते उपस्थित असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यात काल तरी शरद पवार नव्हते. बंगलोरच्या दोन दिवसांच्या बैठकीत सर्व विरोधक मोदींना पर्याय देण्यासाठी विचार मंथन करीत आहेत. विरोधी ऐक्याची ही राजकीय मशागत सुरू असताना आज भाजप प्रणित लोकशाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक नवी दिल्लीत होत आहे.
मोदींनी या बैठकीच्या निमित्ताने “नेहले पे देहला” मारला आहे. कारण विरोधकांच्या 26 पक्षांच्या एकजुटीला भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 38 पक्षांची बैठक घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. Opposition unity of 26 parties BJP’s response to ruling unity of 38 parties today
यामध्ये भाजपला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे सोडून गेलेले पक्षही त्यांच्याबरोबर आले आहेत. यात प्रामुख्याने पंजाब मधून शिरोमणी अकाली दल, उत्तर प्रदेशातून ओम प्रकाश राजभर, बिहार मधून चिराग पासवान आदी नेत्यांच्या पक्षांचा समावेश आहे. त्याचबरोबर तामिळनाडूतून पलानीस्वामी यांचा एआयडीएमके पक्ष आजच्या बैठकीत सामील होणार आहे.
सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत; परकीय नेतृत्व, पण तोकड्या प्रादेशिक नेत्यांपेक्षा मोठे कर्तृत्व!!
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एकूण 38 पक्षांनी आजच्या बैठकीचे कन्फर्मेशन दिल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कालच पत्रकार परिषदेत दिली. गुड गव्हर्नन्स अँड डिलिव्हरी हाच राष्ट्रीय लोकशाहीचा अजेंडा आहे, याकडे त्यांनी काल लक्ष वेधले. त्याचबरोबर बंगलोर मध्ये “डिनर डिप्लोमसी” करणाऱ्या 26 पक्षांच्या विरोधी ऐक्याची त्यांनी “फोटो ऑपॉर्च्युनिस्ट” म्हणून खिल्ली उडवली.
– जुने मित्र परतले
काँग्रेस आणि बाकीचे विरोधक भाजपला मित्र पक्षांची जुळवून घेता येत नाही असा आरोप करत असतात. कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर शिरोमणी अकाली दल आणि अन्य काही पक्ष भाजपला सोडून गेले. पण भाजप सरकारने वेळीच सावरून कृषी कायदे मागे घेतले. त्यामुळे आता ते पक्ष परत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले आहेत. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांची संख्या भाजपपासून 38 झाली आहे. 26 पक्षांच्या विरोधी एकजुटीला वर हा मोदींनी मारलेला “नेहले पे देहला” आहे.
Opposition unity of 26 parties BJP’s response to ruling unity of 38 parties today
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्याच्या बैठकीला पवार गैरहजर, उद्धव ठाकरे नाराज; संजय राऊत उतरले पवारांच्या समर्थनात!!
- गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांची घेतली भेट; गोड्डा पॉवर प्लांट हस्तांतरित, भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू
- दुटप्पी : विधिमंडळात विरोधकांच्या आंदोलनाला शरदनिष्ठ आमदारांची दांडी; विधानसभेत मुश्रीफांच्या शेजारी जयंत पाटलांची खुर्ची!!
- श्रीलंकेने म्हटले- रुपयाचा वापर डॉलरप्रमाणे व्हायला हवा, जर हे कॉमन चलन झाले तर चांगलेच