• Download App
    विरोधकांचे राष्ट्रपति पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज भरणार उमेदवारी अर्ज, विरोधी पक्षांचे हे दिग्गज नेते राहणार उपस्थित|Opposition presidential candidate Yashwant Sinha will file his nomination papers today

    विरोधकांचे राष्ट्रपति पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज भरणार उमेदवारी अर्ज, विरोधी पक्षांचे हे दिग्गज नेते राहणार उपस्थित

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने विरोधक आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतील. 24 जून रोजी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या अर्जात सत्ताधारी पक्षाने आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे आज यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीवरून विरोधक आपली ताकद दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करतील.Opposition presidential candidate Yashwant Sinha will file his nomination papers today

    यशवंत सिन्हा यांच्या नामांकनाच्या वेळी शरद पवार, राहुल गांधी आणि अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचाही सहभाग असेल. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे देखील नामांकनात उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या अर्जासाठी विरोधी पक्षांचे नेते दिल्लीत पोहोचले आहेत.



    असा असेल कार्यक्रम

    सकाळी 11.30 वाजता संसद भवन अॅनेक्सीमध्ये विरोधकांची बैठक होणार आहे.
    दुपारचे 12:00 वाजता राज्यसभेच्या सरचिटणीस कार्यालयाबाहेर विरोधी पक्षांचे नेते जमणार आहेत.
    दुपारी 12.15 वाजता राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी दाखल करणार आहेत.
    दुपारी 1.10 वाजता उमेदवारीनंतर यशवंत सिन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत.

    समीकरणे काय सांगतात?

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएचे संख्याबळ खूपच कमी आहे. मात्र, आपल्या उमेदवाराला कमी लेखण्याची चूक होता कामा नये, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. सध्या एनडीएचा वरचष्मा दिसत आहे कारण एनडीएकडे एकूण 5.26 लाख मते आहेत, जी एकूण मतांच्या सुमारे 49 टक्के आहेत. एनडीएला विजयासाठी एक टक्का वाढवावी लागली, तर बाहेरच्या पक्षाच्या पाठिंब्याने ते शक्य होऊ शकते. तसेच, BJD आणि BSP ने NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशा स्थितीत एनडीएच्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

    Opposition presidential candidate Yashwant Sinha will file his nomination papers today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले