• Download App
    संसदेत गोंधळ घालून विरोधक पोचले जंतर मंतरवर; पण विरोधी ऐक्याला तडाच; तृणमूल, बसपा व आप खासदार आलेच नाहीत |Opposition leaders join farmers at Jantar Mantar, Delhi in their protest against farm laws.

    संसदेत गोंधळ घालून विरोधक पोचले जंतर मंतरवर; पण विरोधी ऐक्याला तडाच; तृणमूल, बसपा व आप खासदार आलेच नाहीत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेगासस हेरगिरीपासून कृषी कायद्यंपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर संसदेमध्ये गोंधळ घालून कामकाज बंद पाडून सर्व विरोधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर वर पोहोचले.Opposition leaders join farmers at Jantar Mantar, Delhi in their protest against farm laws.

    तिथे कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकजुटीने जंतर-मंतर वर जाण्याचा निर्णय आज घेतला होता. त्यानुसार संसदेत गोंधळ घालून हे खासदार जंतर मंतरवर पोहोचले खरे, परंतु त्यांच्यामध्ये तृणमूल काँग्रेस खासदार, बसपा आणि आम आदमी पक्षाचे खासदार नव्हते. या तिन्ही पक्षांनी राहुल गांधी यांचे नेतृत्व मागण्यास नकार दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.



    जंतर-मंतरवर धरण्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अम्बिका सोनी, शिवसेनेकडून संजय राऊत, द्रमुकचे टी. आर. बालू आदी नेते सहभागी झाले आहेत. परंतु ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी यांनी या आंदोलनात जाण्याचे टाळले. यातून विरोधी एकजुटीला त्यांनी तडा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Opposition leaders join farmers at Jantar Mantar, Delhi in their protest against farm laws.

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!