• Download App
    केरळमध्ये सगळ्या नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदी संधी, मुख्यमंत्री विजयन यांचा कामराज पॅटर्न की पक्षांतर्गत विरोधकांना संपविण्याची रणनिती|Opportunity for all new faces in Kerala as a minister, Chief Minister Vijayan's Kamaraj pattern is the strategy to eliminate the opposition within the party

    केरळमध्ये सगळ्या नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदी संधी, मुख्यमंत्री विजयन यांचा कामराज पॅटर्न की पक्षांतर्गत विरोधकांना संपविण्याची रणनिती

    कोरोना काळातील कामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या आरोग्य मंत्री के. के. शैलजाच नव्हे तर मंत्रीमंडळातील सर्वच जुन्या मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी घेतला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मात्र, केरळमध्ये हा कामराज पॅटर्न राबविताना विजयन यांची विरोधकांना संपविण्यची रणनिती आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.Opportunity for all new faces in Kerala as a minister, Chief Minister Vijayan’s Kamaraj pattern is the strategy to eliminate the opposition within the party


    विशेष प्रतिनिधी

    तिरुवनंतपुरम : कोरोना काळातील कामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या आरोग्य मंत्री के. के. शैलजाच नव्हे तर मंत्रीमंडळातील सर्वच जुन्या मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी घेतला आहे.

    नवीन चेहºयांना संधी दिली जाणार आहे. मात्र, केरळमध्ये हा कामराज पॅटर्न राबविताना विजयन यांची विरोधकांना संपविण्यची रणनिती आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.



    केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले तरी राज्य सरकारने त्यांचे योग्य व्यवस्थापन केल होते. त्यामुळे केरळ सरकारचे आणि आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचे कौतुक झाले होते.

    निवडणूक होऊन राज्यात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता आली असतानाही शैलजा यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार नाही. यावेळी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटमध्ये भापक आणि माकपमधील नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

    के.के. शैलजा ह्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांनी कोरोनाच्या साथीला रोखण्यामध्ये सुरुवातीच्या काळात उल्लेखनीय कार्य केले होते. तसेच राज्यात निपाह विषाणूला रोखण्यासाठीही त्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली होती.

    केरळमध्ये २०१८ आणि २०१९ मध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला होता. मात्र त्याला रोखण्यात केरळ सरकार यशस्वी ठरले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोरोनाकाळात के.के. शैलजा यांनी केरळमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी आखलेल्या रणनीतीचे कौतुक केले होते.

    केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडी सरकारचा शपथविधी हा २० मे रोजी होणार आहे. या शपथविधीमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे मुख्यमंत्री विजयन यांच्यासह २१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. हे सर्व मंत्री नवीन असणार आहेत.

    इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बड्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळून पक्षाचे कार्य करण्यास सांगितले होते. त्यावेळच्या बड्या मंत्र्यांकडून इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले जाऊ नये म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला होता.

    त्यामुळे कॉँग्रेसमध्ये फुटही पडली होती. मुख्यमंत्री विजयन यांच्या या रणनितीमागे हेच धोरण आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, स्वत: शैलजा यांनी त्याचा इन्कार केला आहे. त्या म्हणाल्या की डाव्या लोकशाही आघाडीचा हा धोरणात्मक निर्णय आहे.

    केवळ मीच नव्हे तर सगळ्याच जुन्या मंत्र्यांना वगळले जाणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वेळीही मी नवीन होते. त्यामुळे मला मंत्रीपदाची संधी मिळाली होती.

    Opportunity for all new faces in Kerala as a minister, Chief Minister Vijayan’s Kamaraj pattern is the strategy to eliminate the opposition within the party

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!