वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. रुग्णसंख्या कोटीच्या घरात गेली आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. याबाबत त्यांनी ट्विट करून सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे. Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करणं हाच एक पर्याय आहे. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक लोकांना प्राणास मुकावे लागत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशात लॉकडाऊनला विरोध केला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा गरीबांना सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
लॉकडाऊनमुळे कोरोनाला हरवलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं. लसीकरण आणि कोरोना रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून राहुल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.धीम्यागतीने लसीकरण होत असल्याबद्दलही त्यांनी केंद्रावर टीका केली होती.
Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनातून बरे झाल्यावर निर्धास्त राहू नका, तीन चाचण्या आवश्यकच; तज्ज्ञांचा सल्ला
- पंतप्रधानांच्या नव्या घराचे बांधकाम जोरात ; ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ १५ एकर जमिनीवर
- कर्नाटकात ऑक्सिजन अभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू , तब्येत बिघडल्याने दगावले ; रुग्णालयाचा दावा
- मुंबई एक जूनपर्यंत कोरोनाला रोखणार, संसर्गाचा वेग घटणार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा दावा
- जगातील सर्वात श्रीमंत दांपत्याचा घटस्फोट, बिल आणि मेलिंडा गेटस झाले वेगळे
- योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी