• Download App
    लहान मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण; दिल्ली, यूपी, महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सीबीआयचे सर्च ऑपरेशन!!; धक्कादायक खुलाशांची शक्यता । Online child sexual abuse; CBI search operation in 14 states including Delhi, UP, Maharashtra !!; Possibility of shocking revelations

    लहान मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण; दिल्ली, यूपी, महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सीबीआयचे सर्च ऑपरेशन!!; धक्कादायक खुलाशांची शक्यता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लहान मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषण यांचे अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून त्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीबीआयने महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. एकट्या दिल्लीमध्ये 83 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून अन्य राज्यांमध्ये सीबीआयचे अधिकारी जे सर्च ऑपरेशन करत आहेत. Online child sexual abuse; CBI search operation in 14 states including Delhi, UP, Maharashtra !!; Possibility of shocking revelations

    या सर्च ऑपरेशनमधून जी माहिती उघडकीस येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सीबीआयच्या प्रवक्त्याने एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. ज्या 14 राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओरिसा, दिल्ली, हरियाणा, प्रदेश हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे.



    14 नोव्हेंबर या बालदिनी हे सर्च ऑपरेशन सुरू झाले असून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी अनेक धक्कादायक बाबी यातून समोर येणे शक्य आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या सर्च ऑपरेशन बाबतचे अन्य तपशील जाहीर केलेले नाहीत.

    सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत केलेल्या कारवाईत 83 जणांविरुद्ध 23 केसेस दाखल केल्या आहेत. त्यांचाही तपशील लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे. लहान मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषणा विरोधातली थेट केंद्रीय सीबीआय सारख्या थेट केंद्रीय तपास संस्थेने केलेली आत्ता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

    Online child sexual abuse; CBI search operation in 14 states including Delhi, UP, Maharashtra !!; Possibility of shocking revelations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम