वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताची स्वदेशी लस म्हणून कोव्हक्सीन ओळखली जाते. भारत बायोटेक्स निर्मित कोव्हक्सीन लसीचा एक डोस हा दोन डोस इतकाच प्रभावी असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधनातून स्पष्ट झाले आहे. One dose of covacin vaccine is as effective as two doses; Clear from ICMR research
कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला कोव्हक्सीन लसीचा एक डोस दिला आणि कोरोना न झालेल्या व्यक्तीला दोन डोस दिले. तेव्हा दोघांमध्ये तितक्याच प्रमाणात कोरोना प्रतिबंधक अँटिबॉडी तयार झाल्याचे आयसीएमआरच्या संशोधनात स्पष्ट झाले.
या संशोधनाचा अहवाल ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ मध्ये या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. अर्थात केलेले हे संशोधन प्राथमिक टप्प्यात मिळालेल्या डेटावर आधारित आहे. दुसरीकडे जानेवारीत लसीला तातडीच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर ‘ बीबीव्ही १५२’ म्हणजेच कोव्हक्सीनचे दोन डोस चार ते सहा आठवड्याच्या कालावधीत दिले जात आहेत.
लस दिलेल्या व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचे प्रमाण पाहण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर २८ आणि ५६ दिवसांनी अशा चाचण्या घेण्यात आल्या. फेब्रुवारी ते मे या कालावधीत चेन्नई येथे आरोग्य लस घेतलेल्या ११४ कर्मचाऱ्यांमधील अँटिबॉडीजची चाचणी घेतली. तेव्हा त्यातील निष्कर्ष हे देशातील लसीकरण धोरणासाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.
One dose of covacin vaccine is as effective as two doses; Clear from ICMR research
महत्त्वाच्या बातम्या
- संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन
- पुणे महापालिकेचा तुघलकी आदेश, कोरोना नियमभंग करणाऱ्यांकडून दिवसाला दहा लाख रुपये वसूल करा
- मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद