• Download App
    Omicron In India: देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या सावटामुळे सरकार सावध, पीएम मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक । Omicron In India Govt warns of rising Omicron Cases in the country PM Modi's meeting with Chief Minister

    Omicron In India: देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या सावटामुळे सरकार सावध, पीएम मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    13 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते देशातील राज्यांमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत ओमिक्रॉनच्या प्रतिबंधावर चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे, सध्या देशात कोरोना ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. Omicron In India Govt warns of rising Omicron Cases in the country PM Modi’s meeting with Chief Minister


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : 13 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते देशातील राज्यांमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत ओमिक्रॉनच्या प्रतिबंधावर चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे, सध्या देशात कोरोना ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

    गत महिन्यातही अधिकाऱ्यांसोबत बैठक

    कोविडच्या या नवीन प्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उच्चस्तरीय बैठकही घेतली होती. त्या बैठकीत ओमिक्रॉनच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद उपाय, औषधांच्या उपलब्धतेसह आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांचा आढावा घेण्यात आला.



    यावेळी ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, पीएसए प्लांट, आयसीयू, ऑक्सिजन बेड, मानव संसाधन, आयटी हस्तक्षेप आणि लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन प्रकाराबाबत जागतिक स्तरावर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली होती, उच्च लसीकरण कव्हरेज आणि ओमिक्रॉन प्रकारांची उपस्थिती असलेल्या देशांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण आहे.

    देशात कोविड संसर्गाचा वेग काहीसा कमी

    देशात कोविडचा वाढता वेग पाहता आज एक दिलासादायक बातमी आहे की, देशात कोविडच्या प्रकरणांमध्ये काहीशी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 68 हजार 63 नवीन रुग्ण आढळले असून 277 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 6.4 टक्के घट झाली आहे. सोमवारी १ लाख ७९ हजार नवे रुग्ण आढळले.

    कोरोना लसीचे प्रीकॉशन डोस सुरू

    माहिती देताना आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना सोमवारी अँटी-कोविड-19 लसीचा ‘प्रीकॉशन’ डोस सुरू झाला. पहिल्या दिवशी इतर आजारांनी ग्रस्त 60 वर्षांवरील लोक आणि आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाइन वर्कर असलेल्या नऊ लाखांहून अधिक जणांना हा डोस देण्यात आला.

    Omicron In India Govt warns of rising Omicron Cases in the country PM Modi’s meeting with Chief Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??