• Download App
    Omicron @ 33 : दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण, महाराष्ट्रात ३ वर्षांची मुलगी बाधित, मुंबईत कलम 144 लागू । Omicron 33 Another Omicron patient in Delhi, 3-year-old girl infected in Maharashtra, Section 144 enforced in Mumbai

    Omicron @ ३३ : दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण, महाराष्ट्रात ३ वर्षांची मुलगी बाधित, मुंबईत कलम १४४ लागू

    नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. यासह देशातील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने बाधितांची संख्या 33 वर पोहोचली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात 7 नवीन जणांत ओमिक्रॉन संसर्ग आढळून आला. त्यापैकी 3 मुंबईतील आहेत. त्याचवेळी पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड जिल्ह्यात 4 नवीन ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. येथील एका 3 वर्षांच्या मुलीमध्येही ओमिक्रॉनचा संसर्ग आढळून आला आहे. Omicron 33 Another Omicron patient in Delhi, 3-year-old girl infected in Maharashtra, Section 144 enforced in Mumbai


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. यासह देशातील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने बाधितांची संख्या 33 वर पोहोचली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात 7 नवीन जणांत ओमिक्रॉन संसर्ग आढळून आला. त्यापैकी 3 मुंबईतील आहेत. त्याचवेळी पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड जिल्ह्यात 4 नवीन ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. येथील एका 3 वर्षांच्या मुलीमध्येही ओमिक्रॉनचा संसर्ग आढळून आला आहे.



    ही बालिका नायजेरियातील एका ओमिक्रॉन बाधित महिलेच्या संपर्कात आली होती. सध्या बालिकेची प्रकृती सामान्य असून तिला किरकोळ लक्षणे आहेत. तिची आई आणि इतर काही संक्रमित कुटुंबातील सदस्यांसह पिंपरी चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयाच्या विशेष कोविड वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी एकाच कुटुंबातील 6 जणांना ओमिक्रॉनची लागण झाली होती. ज्यामध्ये महिलेचा भाऊ आणि तिच्या दोन मुलींचा समावेश होता. महिलेच्या संपर्कात आलेल्या २२ कोरोना बाधित रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यांचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी समोर आला.

    महाराष्ट्रात १७ रुग्ण

    देशात ‘ओमिक्रॉन’ बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. आता राज्यात ‘ओमिक्रॉन’ बाधितांची संख्या 17 झाली आहे. ३० हून अधिक संशयित रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल येणे बाकी आहे. मुंबईत संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता पुढील दोन दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे.

    मुंबईत ‘ओमिक्रॉन’चा वाढता धोका लक्षात घेऊन शनिवारी आणि रविवारी संपूर्ण शहरात 144 लागू करण्यात आली आहेत. या काळात मोठमोठे मेळावे, रॅली आणि निषेध मोर्चांवर बंदी असेल. पोलीस उपायुक्तांनी जारी केलेला आदेश शनिवारपासून सुरू होणार असून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

    धारावीतही ओमिक्रॉनचा शिरकाव

    शुक्रवारी मुंबईत सापडलेले तीन नवीन रुग्ण टांझानिया, यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील नैरोबी येथून आले आहेत. हे अनुक्रमे ४८, २५ आणि ३७ वयोगटातील पुरुष आहेत. त्यामुळे मुंबईतील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ५ झाली आहे. ‘ओमिक्रॉन’ बाबत सर्वात चिंतेची बाब म्हणजे नवीन बाधितांमध्ये आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत म्हणजेच धारावीत राहणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. हा ४८ वर्षीय मशिदीचा मौलाना असून तो टांझानियाहून येथे आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने लसीचा कोणताही डोस घेतलेला नाही.

    Omicron 33 Another Omicron patient in Delhi, 3-year-old girl infected in Maharashtra, Section 144 enforced in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!