• Download App
    राजा महेंद्र प्रताप विद्यापीठ; पंतप्रधान मोदींनी अलिगडमध्ये काढली कल्याण सिंह यांची आठवण; दिल्या राधा अष्टमीच्या शुभेच्छा occasion of Radha Ashtami today makes it more holy.I wish you all a happy Radha Ashtami.

    राजा महेंद्र प्रताप विद्यापीठ; पंतप्रधान मोदींनी अलिगडमध्ये काढली कल्याण सिंह यांची आठवण; दिल्या राधा अष्टमीच्या शुभेच्छा

    वृत्तसंस्था

    अलिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशातील अलिगडच्या दौऱ्यावर असून त्यांनी तेथे राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कल्याण सिंह यांच्या आठवण जागवली, तसेच जनतेला राधा अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. occasion of Radha Ashtami today makes it more holy.I wish you all a happy Radha Ashtami.

    पंतप्रधान मोदी म्हणाले, की आज राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाच्या भूमीपुजनला कल्याण सिंह हवे होते. राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने उत्तर प्रदेशात मोठे स्मारक व्हावे, ही त्यांची इच्छा होती. विद्यापीठाच्या रूपाने आज ही इच्छा पूर्ण करण्याची संधी उत्तर प्रदेश सरकारला आणि आम्हाला सगळ्यांना मिळत आहे. यावेळी मोदींनी जनतेला राधा अष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या.

    आजचा दिवस पश्चिम उत्तर प्रदेश आणि अलिगडसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉर आणि राजा महेंद्र प्रताप विद्यापीठ यांच्या निमित्ताने एक विकासाचे अत्यंत दमदार पाऊल या प्रदेशात पडत आहे अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्य केल्या.

    या आधी मोदींनी उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉर या प्रदर्शनाला भेट दिली. अलिगडमध्ये संरक्षणविषयक उत्पादनासाठी हा कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून देशांतर्गत संरक्षण साहित्याचे उत्पादन या कॉरिडॉरमधून करण्यात येणार आहे. त्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले.

    occasion of Radha Ashtami today makes it more holy.I wish you all a happy Radha Ashtami.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!