• Download App
    राहुल गांधी नव्हे, वेणुगोपाल मातोश्रीवर; सावरकर ते राष्ट्रवादीतील संभाव्य फूट मुद्द्यांवर चर्चा!! Not rahul Gandhi but k. C. Venugopal came to matoshree and discussed the issue of savarkar and future NCP splits

    राहुल गांधी नव्हे, वेणुगोपाल मातोश्रीवर; सावरकर ते राष्ट्रवादीतील संभाव्य फूट मुद्द्यांवर चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठी माध्यमांनी त्यांच्या “सूत्रां”च्या हवाल्याने पवार अनुकूल नॅरेटिव्ह चालवत राहुल गांधी मातोश्रीवर येणार असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. पण कोणत्याही प्रादेशिक नेत्याच्या घरी जाण्याचा गांधी परिवाराचा इतिहास नाही. त्यामुळे राहुल गांधी नव्हे, तर काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी मातोश्रीवर भेट देऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी वेणुगोपाल यांच्या समवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप होते. शिवसेनेच्या बाजूने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित होते. Not rahul Gandhi but k. C. Venugopal came to matoshree and discussed the issue of savarkar and future NCP splits

    यावेळी या सर्व नेत्यांमध्ये सावरकर ते राष्ट्रवादीतील संभाव्य होत या विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. सावरकर मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत दम भरल्यानंतर शरद पवारांनी राहुल गांधींना दिल्लीच्या 18 पक्षांच्या बैठकीत बॅकफूटवर ढकलले होते. त्यानंतर नीतीश कुमार यांनी मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि वेणुगोपाल यांची भेट घेतली.

    त्याच्या दुसऱ्या दिवशी मल्लिकार्जुन खरेदी आणि राहुल गांधींनी शरद पवारांना फोन करून दिल्लीत बोलवून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी राहुल गांधींनी मातोश्रीवर भेट द्यावी, अशी सूचना केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिल्या होत्या. अर्थातच त्या खोट्या ठरल्या. राहुल गांधी नव्हे, तर के. सी. वेणुगोपाल यांनी मातोश्रीला भेट दिली.

    मराठी माध्यमांच्या मूळ बातमी नुसार राहुल गांधी हे सावरकर मुद्द्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार होते. पण राहुल गांधी न येता वेणुगोपाल मातोश्रीवर आल्याने त्यांनी सावरकर मुद्द्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा केलीच, पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात शिजत असलेल्या राष्ट्रवादीच्या संभाव्य फुटीच्या बातमीवर देखील या चर्चा झाली. राष्ट्रवादीत फूट पडणारच असेल आणि मोठा गट भाजपला जाऊन मिळणारच असेल तर उर्वरित दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांची एकजूट मजबूत करण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भर दिला आणि काँग्रेसची गाजत असलेली मातोश्री भेट संपन्न झाली.

    Not rahul Gandhi but k. C. Venugopal came to matoshree and discussed the issue of savarkar and future NCP splits

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी